आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून वागदरी येथे 38 लाख रु मंजूर कामाचा शुभारंभ हन्नुरचे उपसरपंच श्री सागर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते संपन्न..
विकास कामे भूमिपूजन समारंभ

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून वागदरी येथे 38 लाख रु मंजूर कामाचा शुभारंभ हन्नुरचे उपसरपंच श्री सागर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते संपन्न..


वागदरी — आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून पर्यटन विकास खात्त्याकडून वागदरी येथील श्री परमेश्वर मंदिर सभामंडपसाठी 25 लाख रु व तसेच 2515 योजनेअंतर्गत श्री घाळीदास मंदिर सभामंडपसाठी 7 लाख रु आणि वार्ड क्रमांक 4 मधील माने घर ते भरमदे-कणमुसे घरापर्यंत सिमेंट रस्ता आणि बंदिस्त गटारसाठी 6 लाख रुअसे एकूण 38 लाख रु मंजूर कामाचा शुभारंभ हन्नुरचे उपसरपंच श्री सागरदादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते आज वागदरी येथे संपन्न झाले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते श्रीशैल काका ठोंबरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंदिर समितीचे सचिव मल्लप्पा मामा निरोळी,बसवराज शेळके सावकर ,जेष्ठ नेते प्रदीप जगताप,सरपंच श्रीकांत भैरामडगी, मा उपसरपंच लक्ष्मीबाई पोमाजी,सुनील सावंत,प्रकाश पोमाजी, घाळय्या मठपती सर,कमलाकर सोनकांबळे,राजकुमार हुग्गे,हनिफ मुल्ला,शिवा घोळसगाव,रमेश मंगाणे, श्रीमंत कुंठोजी,शिवशरण यमाजी,परमेश्वर खसगी,दयानंद कुंभार, धनंजय सलगरे, रोहित शिंदे, राज शिंदे, सौरभ उंबरे, राम मोरे,विवेक कुंभार,संतोष पोमाजी,श्याम बाबर,शांतू कोठे,भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष जयश्री बटगेरी,महादेव सोनकवडे, रमेश मंगाने, मकबूल कणमुसे, परमेश्वर शेळके,विरभद्र पुरंत,माळप्पा धनगर, परमेश्वर मंदिर पंच कमिटी,परमेश्वर आराधना पंच कमिटी,घाळीदास मंदिर पंच कमिटी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
