गावगाथा

युवकांनी व्यवसायात यावे उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळेत आ.सुभाष बापू देशमुख यांचे प्रतिपादन

सोलापूर सोशल फाउंडेशन व लोकमंगल बँक शाखा मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने मारापुर येथे उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न!

युवकांनी व्यवसायात यावे उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळेत आ.सुभाष बापू देशमुख यांचे प्रतिपादन

सोलापूर सोशल फाउंडेशन व लोकमंगल बँक शाखा मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने मारापुर येथे उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न!

दक्षिण सोलापूरचे लोकप्रिय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मारापुर ता.मंगळवेढा येथे उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली, यावेळी बोलताना सुभाष बापू म्हणाले की युवकांनी व्यवसायात यावं, कोणताही व्यवसाय छोटा नसतो, आपण झोकुन देऊन काम करा आणि यासाठी मी कोणत्याही मदतीची पूर्तता करायला तयार आहे अशा शब्दांत नवोदित व्यवसायिकांसोबत संवाद साधला. सोलापूर सोशल फाउंडेशन व लोकमंगल को-ऑप. बँक शाखा मंगळवेढा यांच्या वतीने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.जावेद आत्तार झोनल हेड पश्चिच भारत. (NEIDCO), ऑडिटर आणि कर सल्लागार मा.अनंत नाईकनवरे, सोलापूर जिल्हा क्लस्टर हेड – (NEIDCO) मा. मुबारक शेख, शाखाधिकारी शिवाजी दरेकर आदी वक्त्यांनी उद्योग विषयक मार्गदर्शन केले. यावेळी सल्लागार हरिभाऊ यादव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन समन्वयक विजय कुचेकर यांनी केले. यावेळी मुख्य समन्वयक विजय पाटील, अनिल वगरे, अमोल पाटील, तानाजी माने इ. मान्यवर व मोठ्या संख्येने युवक आणि गावकरी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button