गावगाथा

*सलग सुट्यांमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट मध्ये राज्यासह देश-विदेशातून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी ; पोलिस प्रशासन चोख बंदोबस्त साठी काटेकोरपणे नियोजन करण्यासाठी तप्तर तयार*

अन्नछत्र मंडळाची चोख पार्किंग व्यवस्था :

*सलग सुट्यांमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट मध्ये राज्यासह देश-विदेशातून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी ; पोलिस प्रशासन चोख बंदोबस्त साठी काटेकोरपणे नियोजन करण्यासाठी तप्तर तयार*

⭕अक्कलकोट :(प्रतिनिधी)
*सलग सुट्यांमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट मध्ये राज्यासह देश-विदेशातून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झालेली असून, पोलीस अधिक्षक शिरीष देशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रीतमकुमार यावलकर, उप विभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी स्वतः रस्तावर उतरून वाहतूक व्यवस्था सुरळीत करून घेतले. काटेकोर नियोजन व चोख बंदोबस्तामुळे स्वामी भक्तांना सतत येणाऱ्या अडचणीवर कांही अंशी मात करणे शक्य झाले आहे. मात्र कायम स्वरूपी तोडगा निघणे काळाची गरज आहे.*

दरम्यान पोलिस प्रशासनाने शहरातील वाहनांची कोंडी टाळावी म्हणून मैंदर्गी व बासलेगांव कडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी वाहन चालकांचे लक्ष वेधण्यासाठी उद्घोषणाची सोय केली होती. यासह शहरातील कमलाराजे चौक, कारंजा चौक, मैंदर्गी रोड या ठिकाणी बॅरिकेडिंग करून वाहनांना मंदिर परिसरात सोडले नाही. त्यामुळे भाविकांनी मिळेल त्या ठिकाणी वाहने लावण्यात येत असल्याने शहराच्या वाहतुक कोंडीत भर पडली. यामुळे स्थानिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला.

सलग सुट्यांमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गर्दी वाढत चाललेली आहे. या सुट्यांमुळे १० लाखांहून अधिक भाविकांनी स्वामींचे दर्शनासाठी येतील असा अंदाज प्रशासकीय यंत्रणेचा असून, सतत वाढत चाललेल्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी, निवासासाठी प्रतीक्षा व नाहक त्रास, अरुंद रस्ते व अस्वच्छता यामुळे भाविकांना अनेक अडचणीच्या सामोरे जावे लागत आहे. येणाऱ्या भाविकांना सुलभ सुविधा मिळण्याकामी पोलीस प्रशासन वगळता नगरपरिषदेसह अन्य विभागाकडून बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसत होते.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, मुरलीधर मंदिर, समाधी मठ (चोळप्पा मठ), गुरु मंदिर (बाळप्पा मठ), राजेराय मठ, शिवपुरी, नवसाचा मारुती मंदिर, एकमुखी दत्त मंदिर व अन्नछत्र मंडळातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर येथे दर्शनासाठी व महाप्रसादाकरिता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे प्रचंड गर्दी झालेली आहे.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व समाधी मठ (चोळप्पा मठ) येथे पहाटेपासून ते रात्रो उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होत आहे. अक्कलकोट शहरात सर्वत्र रस्त्याच्या कडेला भाविकांची वाहनेच वाहन दिसत होती. गर्दीमुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे यात्रीनिवास, यात्रीभुवन व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देव्बास्थान समितीचे भक्तनिवास, शिवपुरी आणि शहरातील लॉजिंग फुल्ल झाले आहेत.

गेल्या तीन दिवसापासून श्रीक्षेत्र अक्कलकोटला ३ लाखाहून अधिक वाहने आल्याचे वळसंग टोळ नाक्याच्या सूत्रांनी सांगितले. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत सुमारे १० लाखाहून अधिक वाहने श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येथील असे अंदाज असून, यासाठी आताच वाहन तळाची व्यवस्था करणे काळाची गरज असल्याचे स्थानिक नागरीकातून बोलले जात आहे.

*⭕चौकट :
*अन्नछत्र मंडळाची चोख पार्किंग व्यवस्था :
सलग सुट्यांमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट मध्ये राज्यासह देश-विदेशातून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झालेली असून, मंदिर परिसरातील वाहनांची कोंडी ही अन्नछत्र मंडळातील पार्किंग व्यवस्थे मुळे टळली आहे. वाढत्या भाविकांच्या संखेमुळे महाप्रसाद वाटपाचा वेळ देखील अन्नछत्र मंडळाकडून वाढविल्याने भक्तातून समाधान व्यक्त होत आहे.

*⭕चौकट :
*ऐकेरी मार्ग व नो पार्किंग झोन :
मैंदर्गी नाका चौक ते फत्तेसिंह चौक याठिकाणी ऐकेरी मार्ग होऊन चार चाकी वाहनांना नो पार्किंग झोन करण्याची मागणी आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी एका पत्रकान्वे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तहसीलदार बाळासाहेब सिरसट, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्याकडे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button