गावगाथा

अक्कलकोट बसस्थानकांचे कोर्टाकडून स्टे रद्द, भूमिपूजन मार्ग मोकळा

अक्कलकोट बस स्थानक आणि कर्तव्यकठोर आमदार सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट बसस्थानकांचे कोर्टाकडून स्टे रद्द, भूमिपूजन मार्ग मोकळा

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट बस स्थानक आणि कर्तव्यकठोर आमदार सचिन कल्याणशेट्टी

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट ( प्रतिनीधी ) गेल्या कित्येक वर्षापासून अक्कलकोट बसस्थानक विकासापासून वंचित आहे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे सतत पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतले परंतु काही लोकांच्या आडमुठेपणा व विकास कामाला पीळ घालण्याच्या उद्देशाने कोर्टात गेले होते अखेर सत्याच्या बाजूने परमेश्वर असतोच अखेर बसस्थानक भूमिपूजन मार्ग मोकळा झाले आहे

HTML img Tag Simply Easy Learning    

कुठल्याही शहराच्या सौंदर्यामध्ये आणि विकासामध्ये सर्वात जास्त भर घालणारे ठिकाण म्हणजे त्या शहराचे सुंदर सुसज्ज बस स्थानक.आपले अक्कलकोट शहर हे आपल्या जिल्ह्याच शेवटच टोक पण रहदारी आणि प्रवासी संख्या सर्वात जास्त असलेलं ठिकाण .पंढरपूर,तुळजापूर, गाणगापूर, हैद्रा,बऱ्हाणपूर या प्रसिद्ध देवस्थानांनी वेढलेले आणि खुद्द अक्कलकोट शहर हे स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र वास्तव्याने अजरामर झालेले दररोज भाविक भक्तांची प्रचंड गर्दी असते.पण आपल्या शहरामध्ये त्यामानाने मोठ बस स्थानक नाही ही खरी शोकांतिका आहे.
पण ही शोकांतिका आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी रूपाने लवकर दूर होणार आहे.खरतर दोन महिन्यापूर्वीच या कामास सुरुवात झाली.पण काही अप्पलपोटी,विघ्नसंतोषी लोकांनी अडमुटेपना घेऊन त्याला खो घालण्याचा प्रयत्न केला.मागे हटतील ते दादा कसले. दादांनी त्या लोकांना चांगलाच हिसका दाखवला.आणि आज परत स्टँड परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिम सुरू झाली.खर तर दहा वीस वर्षापूर्वीच या कामास सुरुवात होण अपेक्षित होत पण मताच्या लाचारीपाई तेव्हाच्या राज्यकर्त्यानी ह्या पवित्र कार्यातून आपले अंग बाजूला काढून घेतले कोणाचीही हिम्मत झाली नाही की ते अतिक्रमण काढावं ती हिम्मत दाखवली फक्त दादांनी आजकाल समाजामध्ये आपल ते आपल आणि दुसऱ्याच देखील आपलच ही प्रवरुत्ती वाढत आहे.स्टँड परिसरामध्ये अनधिकृतपणे मोठ मोठे हॉटेल, गोडवान , अनेक व्यावसायिक आहेत ते देखील काढणे गरजेचे आहे
अक्कलकोटकराना खूप अभिमान वाटत आहे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी हे तालुक्याच्या विकासाची कुठलीच पर्वा न करता विकास कामाचे सपाटा चालू केले आहे त्यामुळे येत्या काळात अक्कलकोटचे चेहरा मोहरा बदल्याशिवाय राहणार नाही,खऱ्या अर्थाने स्टँड परिसर मोकळा श्वास घेत आहे अतिक्रमण जागा ही थोडी नाही कमीतकमी एक एकरभर आहे.कुठलीही गोष्ट करण्यासाठी ,मोठा निर्णय घेण्यासाठी स्वतः जवळ हिम्मत,आणि प्रामाणिक प्रयत्न असावे लागतात,मताच्या लाचारी साठी एकदा महत्वाचं काम बाजूला सारून आपल्याच शहराची बदनामी करणे योग्य नाही, शहराच्या विकासासाठी कुठलाही एक समाज महत्वाचं नसून कठोर निर्णय घेऊन ते कार्य सिद्धीस नेण महत्वाचं असत.नेमक तेच काम आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी करत आहेत त्याच्या विकास कामाचे मतदार संघात सर्वत्र कौतुक होत आहे व येणाऱ्या नाजिकच्या काळामध्ये भूमिपूजन होऊन सुंदर अस बस स्थानक निर्माण होईल.नवीन बस स्थानक हे आपल्या ऐतिहासिक अक्कलकोटच्या वैभवामध्ये नक्कीच भर घालेल.आणि देशभरातून येणाऱ्या भाविक भक्तांना आनंदाची सुखाची प्रचीती देईल.

HTML img Tag Simply Easy Learning    

न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

HTML img Tag Simply Easy Learning    

राज्य शासनाकडून पाठपुरावा करून अक्कलकोट बस स्थानक विकासासाठी 29 कोटी मंजुरी करण्यात आले आहे दुर्दैवाने सदरबाब कोर्टात जाणे खेदजनक आहे अखेर न्याय देवताने न्याय दिला लवकरच कामाचे सुरुवात होऊन अक्कलकोटकराच्या स्वप्नातील सुंदर दिव्य भव्य असे बसस्थानक होणार आहे न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो

आमदार सचिन कल्याणशेट्टी, अक्कलकोट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button