गावगाथा

मराठी, हिंदी व कन्नड भावगीते व भक्तीगीतांनी ख्यातनाम गायिका आर्या आंबेकर यांच्या ‘स्वर आर्या’ एक भाव मैफिल या सदाबहार कार्यक्रमाने श्रोते भारावले

अन्नछत्र मंडळ गुरूपौर्णिमा उत्सव विशेष

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*गणराया..!, नरसोबाच्या वाडीला जाईन..!, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा..! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..! तारकमंत्र, विठ्ठल..! विठ्ठल…!!, निशंक हो.. निर्भय हो..!, अशा एक ना अनेक मराठी, हिंदी व कन्नड भावगीते व भक्तीगीतांनी ख्यातनाम गायिका आर्या आंबेकर यांच्या ‘स्वर आर्या’ एक भाव मैफिल या सदाबहार कार्यक्रमाने श्रोते भारावले होते.*

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३७ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, शुक्रवार सायंकाळी ७ वा. ‘स्वर आर्या’ एक भाव मैफिल, सादरकर्ते – आर्या आंबेकर व सहकलाकार मुंबई ह्या कार्यक्रमाने दुसरे पुष्प संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन स्टेट बँक ऑफ इंडिया अक्कलकोट शाखेचे व्यवस्थापक विकास खडतकर, भूमिअभिलेखच्या कार्यालयीन अधिक्षक संतोष बिराजदार, डॉ. मनोहर मोरे, डॉ.अर्जुन मुगुटराव, डॉ. अजिंक्य मुगुटराव, डॉ.आसावरी पेडगावकर, डॉ.विवेकानंद करपे, डॉ. अॅड.विजय हर्डीकर, अॅड.भानुदास कोळी, अँड.संतोष खोबरे, न्यासाचे लेखापाल ओंकारेश्वर उटगे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते – आर्या आंबेकर आणि सहगायक अजित विसपुते, तबला -आदित्य आटले, पखवाज डॉ.राजेंद्र दूरकर, रोहन वणगे, अनय गाडगीळ, रोहित कुलकर्णी, तालवाद्य सूर्यकांत सुर्वे, निवेदिका स्नेहल दामले यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले. न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यात आले.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, हिरकणी संस्थेच्या जयश्री मगर, स्वाती निकम, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, क्रांती वाकडे, संगीता भोसले, अंजना पवार, उज्वला भोसले, कोमल क्षीरसागर, सुवर्णा घाडगे, छाया पवार, रुपा पवार व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, सुरेशचंद्र सूर्यवंशी, दिलीप सिद्धे, राजेंद्र लिंबीतोटे, संतोष भोसले, लक्ष्मण पाटील, काशिनाथ गोळ्ळे, मनोज निकम, प्रा.शरणप्पा आचलेर, अरविंद शिंदे, शीतल फुटाणे, राजु नवले, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, संजय गोंडाळ, सौरभ मोरे, रोहित खोबरे, स्वामीराव मोरे, टिनू पाटील, महेश दणके, धनंजय गडदे, अमित थोरात, बाळासाहेब घाटगे, प्रसाद हुल्ले, गोविंद शिंदे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल यांनी केले.

चौकट :
गुणीजन गौरव : यामध्ये विशेष गौरव पुरस्कार सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा सरकारी वकील अॅड.प्रदिपसिंग राजपूत व दक्षिण पोलीस ठाण्याचे महिला पोलीस नाईक ज्योती सगुमळे, पोस्ट ऑफिसचे जी.डी.एस.श्रीमती शांताबाई पोळ, इतिहास अभ्यासक व पुरातत्व संशोधक नितीन अणवेकर यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

चौकट :
गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.

चौकट :
शनिवार दि. १३ जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत आदेश बांदेकर प्रस्तुत ‘खेळ मांडीयेला’ (खेळ, किस्से, गप्पा, साऱ्या कुटुंबासाठी) हा कार्यक्रम सादर होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button