अक्कलकोट बसस्थानकात जीवघेणे खड्डे ; प्रशासनाचे दुर्लक्ष

अक्कलकोट (प्रतिनिधी): येथील एसटी स्टॅण्ड समोर मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शिवाय चेंबर चे जाळी / झाकण देखील तुटलेल्या अवस्थेत आहे. पावसामुळे बसस्थानक परिसर चिखलमय झाला आहे. यामुळे बसस्थानक परिसरात वाहन चालक आणि प्रवाशांना जीवघेणा खड्यांमुळे व चिखलामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. हया खड्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भिती नागरिकांमध्ये आहे.

यामुळे बसस्थानकात वाहन घेऊन जाणे कठीण होत आहे. याकडे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व नगरपालिकाने लक्ष देऊन काम करून घ्यावी अशी मागणी नागरिकांतून व रिक्षा चालकांकडून होत आहे. अनेक दिवसांपासून प्रशासन हया कडे दुर्लक्ष करीत आहे.

याठिकाणी अनेक दिवासांपासून मोठे खड्डे पडले आहेत. याच ठिकाणाहून प्रवासी, रिक्षा, बस, मोटारसायकल हजारो संख्येने ये-जा करीत आहेत. येथील खड्यात अनेकजण पडून जखमी ही झाले आहेत.
