*चपळगाववाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अनसर नदाफ तर उपाध्यक्षपदी सौ.कावेरी महेश परशेट्टी*
शाळा व्यवस्थापन समिती

*चपळगाववाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अनसर नदाफ तर उपाध्यक्षपदी सौ.कावेरी महेश परशेट्टी* अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्यासाठी पालकसभेचे आयोजन करण्यात आले होती. यात नूतन शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली.प्रत्येक वर्गातून २ पालकसदस्यांची एकमताने निवड करुन , निवडून आलेल्या पालक सदस्यांमधून एक अध्यक्ष व एक उपाध्यक्षाची निवड करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष म्हणून श्री अनसर तारभाषा नदाफ व उपाध्यक्ष म्हणून सौ.कावेरी महेश परशेट्टी यांची बिनविरोध निवड झाली.आज २०२४ ते २०२६ कालावधीसाठी पुनर्गठीत झालेली नूतन शाळा व्यवस्थापन समिती अशी राहील –
१)श्री अनसर तारभाषा नदाफ – अध्यक्ष
२)सौ.कावेरी महेश परशेट्टी – उपाध्यक्ष
३)श्री निसार राजेभाई नदाफ सदस्य
४)श्री स्वामीनाथ चंद्रकांत परशेट्टी – सदस्य
५) श्री हुसेनबाशा नबीलाल नदाफ – सदस्य
६)सौ.सुजाता मल्लिनाथ यणगुरे – सदस्या
७)सौ.कलावती महादेव बन्ने – सदस्या
८)सौ.सुनीता रेवणसिध्द गोविंदे – सदस्या
९)श्री बापूराव महादेव गोविंदे – शिक्षणप्रेमी
१०) श्रीमती स्वाती सु.कडलासकर – शिक्षक प्रतिनिधी
११)चि.ओम बसवराज माशाळकर – विद्यार्थी प्रतिनिधी
१२)कु.सबिया बाशा नदाफ – विद्यार्थी प्रतिनिधी
१३)श्री शिवशरण चंद्रशेखर गोविंदे – मुख्याध्यापक/सचिव
आज शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया सुरळीतपणे आणि बिनविरोध पार पाडण्यासाठी मावळते अध्यक्ष श्री गौरीशंकर दोड्डाळे,मावळते उपाध्यक्ष श्री करीम नदाफ,मावळते शिक्षणप्रेमी सदस्य श्री मुलका नदाफ,माजी सरपंच श्री विश्वनाथ दोड्डाळे,पोलिस पाटील श्री सिकंदर नदाफ,महम्मद नदाफ,पैगंबर नदाफ,सिध्दाराम अंकलगे,ईलाइ नदाफ यांनी विशेष प्रयत्न केले.निवडप्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी श्री तुकाराम जाधव व मुख्याध्यापक श्री शिवशरण गोविंदे सरांनी अथक प्रयत्न केले.
यावेळी निरीक्षक म्हणून चपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री जीवराज खोबरे साहेब उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन समिती निवड प्रक्रियेत सर्वच पालकांनी सहभाग घेतला.
