गावगाथा

एकोणीस वर्षाचा शुभम ठरला ज्यु. मुंबई श्री २०२३ चा किताब विजेता

स्पोर्ट्स

एकोणीस वर्षाचा शुभम ठरला ज्यु. मुंबई श्री २०२३ चा किताब विजेता

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन (नियोजित) आणि आय लव्ह मुंबई (I Love Mumbai) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन, इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन यांच्या मान्यतेने गुरुवर्य मा.मधुकर तळवळकर सर यांच्या आशीर्वादाने आयोजित “ज्यु. मुंबई श्री” २०२३ मोठ्या दिमाखात जोगेश्वरी पूर्व येथे पार पडली.वर्ल्ड बॉडीबिल्डिंग आणि फिजिक स्पोर्ट्स फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल मा.चेतन पाठारे, वर्ल्डचे लीगल काऊन्सल ऍड. मा.विक्रम रोठे, इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या जनरल सेक्रेटरी मा.हिरल शेठ मॅडम , भारत श्री मा.किरण पाटील, भारत श्री मा.मनीष आडविलकर यांनी स्पर्धेला उपस्थिती लावून स्पर्धेत एक वेगळीच ऊर्जा आणली.मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.श्री.राहुल कनालजी, उपाध्यक्ष मा.कुमार मिचानी, मा.कंदारी, तसेच संघटनेचे सचिव मा. अमोल कांबळी आणि खजिनदार जोसेफराज ऍंथोनी यांनी या स्पर्धेची धुरा सांभाळली. स्पर्धा यशस्वी करण्यात मा.सूर्यकांत सालम यांनी मोलाचा वाटा उचलला. स्पर्धेला आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू निशरीन पारीख, आंतरराष्ट्रीय खेळाडू सुहास पुजारी, रोहन धुरी, आशुतोष सहा, निलेश दगडे, रोहन, संदीप सावळे, नितीन शिगवण, अतुल आंब्रे अश्या दिग्गज खेळाडूंचे मार्गदर्शन नविन पिढीला लाभले.दिव्यांग श्री. मेहबूब शेख,सुरेश दासरी मास्टर्स गटात अरुण पाटील, रोहन धुरी, जितेंद्र शर्मा, प्रमोद जाधव आणि ज्यु. मेन्स स्पोर्ट्स फिजिक रोशन पंडा यांनी बाजी मारली. एकोणीस वर्षाचा शुभम सकपाळ हा “ज्यु.मुंबई श्री २०२३” चा मानकरी ठरला. अथक परिश्रम आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्याने हा किताब आपल्या नावी नोंदवला. आपल्या आईचे आणि गुरूंचे आभार मानताना शुभमचे डोळे भरून आले.या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन स्पर्धेसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत केलेल्या सर्व हितचिंतकांचे आणि स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व ऑफिसिअल्स यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button