मजरेवाडी हिंदु व लिंगायत स्मशानभूमी विकास कामासाठी तीन कोटी निधी द्यावे-विजयकुमार हत्तुरे
मनपा आयुक्त शितल तेली उगले यांच्याकडे मागणी

मजरेवाडी हिंदु व लिंगायत स्मशानभूमी विकास कामासाठी तीन कोटी निधी द्यावे-विजयकुमार हत्तुरे

मनपा आयुक्त शितल तेली उगले यांच्याकडे मागणी


सोलापूर शहर हद्दवाढ भागातील श्री सिध्देश्वर साखर कारखाना लगत मजरेवाडी परिसरातील हिंदु व लिंगायत (रुद्रभूमी) नागरीकांसाठी स्मशानभूमी २००९ मध्ये माजी गृहमंत्री मा.श्री.सुशिलकुमार शिंदे साहेब व आ.प्रणिती शिंदे व विष्णुपंत तात्या कोठे तसेच सोलापूर तत्कालीन मनपा आयुक्त श्री. रणजीतसिंह देओल यांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्मशानभूमीसाठी ३ एकर जमीन भूसंपादन करुन कार्यान्वीत करण्यात आले होते. सन २०१० नंतर मनपा आयुक्त सौरभ राव व चंद्रकांत गुड्डेवार यांनी स्मशानभूमी सुधारणे करीता वेळोवेळी निधी देवून हिंदू लोकांसाठी १ एकर जागेमध्ये दहन शेड व वेटींग शेड बांधण्यात आले होते. तसेच लिंगायत समाजातील लोकांसाठी २ एकर जागेमध्ये रुद्रभूमी (दफन) करण्याकरीता सोय करण्यात आली होती. सदर स्मशानभूमी येथे वॉल कंम्पाऊंड व अंतर्गत रोड, वीजेची दिवे व जन्म-मृत्यु दाखला देणे करीता रुम बांधण्यात आले आहेत. जुळे सोलापूर व मजरेवाडी या परिसरातील सुमारे दोन लाख लोकांची या ठिकाणी स्मशानभूमीची सोय झालेली आहे. अशी माहिती लिंगायत समाजाचे नेते तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हतुरे यांनी दिली.
परंतू गेल्या १० वर्षापासून सदरच्या ठिकाणी कोणतेही विकास कामे केले नसल्यामुळे खालील सर्व विकास कामे होणे अत्यंत गरजेचे आहे.

१) होटगी रोड ते स्मशानभूमी पर्यंत नव्याने रस्ता डांबरीकरण करणे.

२) लिंगायत लोकांसाठी वेटींगशेड नसल्याकारणाने नागरीकांचे आतोनात हाल होत आहेत. तरी वेटींग शेड बांधण्यात यावे.
३) सदरच्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यात आलेली असून पाईपलाईन अभावी पाण्याची सुविधा नाही. तरी पाण्याची नविन पाईप लाईन टाकून पाण्याची व्यवस्था करण्यात यावे.
४) हिंदु स्मशानभूमीसाठी एकच दहन शेड असून या ठिकाणी विद्युतदाहीनी बसवुन मिळावे.
५) सदरच्या ठिकाणी रुम उपलब्ध आहे, तेथे मृत्यु दाखला देण्याकरीता व देखभालीसाठी वॉचमन नियुक्ती करण्यात यावे. ६) सदर या भागातील नागरीकांसाठी कैलासरथ (शववाहिका) ची सोय करण्यात यावी.
७) सदरच्या ठिकाणचे गेट चोरीस गेले आहे. या प्रकरणाचे चौकशी करुन कायदेशीर कारवाईचे आदेश द्यावे व गेट बसवुन द्यावेत. सदरच्या स्मशानभुमीसाठी वॉचमन नसल्याकारणाने काही नागरीक याठिकाणी दारुपिणे, शौचालय म्हणून वापर करीत आहेत. अशाप्रकारे अनेक गैरवापर होत आहे. त्यामुळे प्रेतांची विटंबणा होत आहे. असे गैरप्रकार थांबविण्या करीता ताबडतोब वॉचमन नियुक्ती करण्यात यावे.
वरील मागण्या नागरीकांसाठी अत्यंत गरजेचे असून आपण या विषयात तात्काळ लक्ष घालून महानगरपालिका अंदाजपत्रकात, स्मार्टसिटीच्या फंडातून स्मशानभूमी विकास निधी व नगरोत्थान योजनेतून निधी किंवा डीपीडीसी फंडातून उपलब्ध करुन मजरेवाडी येथील स्मशानभुमीचे विकास कामे करावे. अशा विविध मागणीचे पत्र सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शितल तेली उगले मॅडम व अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे साहेब यांच्याकडे लिंगायत समाजाचे नेते माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी आयुक्त तेली उगले मॅडम यांनी स्मशानभूमी विकास कामासाठी बजेट तरतूद करण्याचे आश्वासित केले आहे. नगर अभियंता विभागास इस्टिमेट तयार करण्याचे आदेश दिले. याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे नूतन नगर अभियंता सारिका आकुलवार,नागेश पडणुरे उपस्थित होते.