*दहिटणे(माळी गल्ली) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व श्री वटवृक्ष महिला बचत गट वर्धापन दिन साजरी*
जयंती विशेष

*दहिटणे(माळी गल्ली) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व श्री वटवृक्ष महिला बचत गट वर्धापन दिन साजरी*
……………………………………….
दहिटणे – दहिटणे येथील माळी गल्लीत वटवृक्ष महिला बचत गट वर्धापन दिन व आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीग्रामपंचायत सदस्य श्री रमेश स्वामी सर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून बचत गटाच्या तालुका समन्वयक सौ.रेश्माताई चौधरी, ग्रामपंचायत सदस्या कु.चंद्रकला कांबळे माजी सरपंच सुजाताताई म्हेत्रे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे बचत गटाच्या समन्वयक सौ.रेश्माताई चौधरी,मा. ग्रामपंचायत सदस्य श्री रमेश स्वामी सर यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रमेश स्वामी सर यांनी आजच्या आधुनिक युगात स्री ही सर्व क्षेत्रात अग्रक्रम असल्याचे सांगत सावित्रीबाईचे जीवनपट सांगितले.जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी या उक्तीप्रमाणे सर्व भगिनींनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावे.आपल्या मुलांना शिक्षणाबरोबर संस्काराचे धडे देऊन एक सुसंस्कृत माणूस घडविणे काळाची गरज आहे.आधुनिक युगातील महिलांचे कर्तृत्व फार मोठे आहे.सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक क्रिडा आदी क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.समृद्ध भारत घडविण्यासाठी महिलांचे योगदान खूप मोठे आहे.सावित्रीच्या लेकीनी सर्व क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी.व नव्या पिढीतील मुलींनी आपल्या स्वप्नांनाही आता पंख द्यायला हवे.आजच्या युगात स्त्रियांनी खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक कार्यक्षेत्रात खूप मोठे नाव कमावले आहे.याचा सर्वांनी आदर करावा.असे सांगत त्यांच्या पुढील वाटचालीस प्रेरणा देऊन स्वागत करु या. तरच आजची महिला उद्याची एक सक्षम महिला घडण्यास वेळ लागणार नाही.असे आपल्या विचार व्यक्त करत वटवृक्ष महिला बचत गटाच्या वर्धापन दिन निमित्त त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.कार्यक्रमाप्रसंगी वटवृक्ष बचत गटाचे अध्यक्ष, सचिव सर्व सदस्य व माळी गल्लीतील माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बचत गट अध्यक्षा अध्यक्षा सौ.सुजाताताई काळे यांनी तर आभार रुपालीताई म्हेत्रे यांनी मानले.
