हिट अँड रन वाहन चालकासाठी केलेला जाचक कायदा रद्द करा वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने तहसीलदारांना निवेदन——-
केंद्र सरकार करीत असून तो तुरंत रद्द करावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी शहर व तालुक्याच्या वतीने जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

हिट अँड रन वाहन चालकासाठी केलेला जाचक कायदा रद्द करा वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने तहसीलदारांना निवेदन——-
अक्कलकोट (प्रतिनिधी)-हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने हिट अँड रन हा कायदा पास करण्यात आलेला आहे. त्यामध्ये वाहन चालक यांच्याविरुद्ध एका प्रकारचा अन्याय केला असून ,अपघात झाला की दहा वर्षे कैद व सात लाख रुपये दंडाची तरतूद केंद्र सरकारने या कायद्यात करण्यात आलेला आहे .तो अन्यायकारक असून तुरंत रद्द करावा यासाठी वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने माननीय तहसीलदार बाळासाहेब शिरसाट साहेब यांना निवेदन देण्यात आला.
…. कोणत्याही राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावर चालकांना पुरेशी सुविधा नाही ,विमा संरक्षण नाही ,चोरापासून संरक्षण नाही ,किंवा आराम करण्यासाठी दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतरावर आराम घर नाही ,एखादा अपघात झाला आणि वाहन चालकाचा जीव गेला तरी त्याला नूकसान भरपाई नाही, केवळ तुटपुंज्या पगारावर आपल्या कुटुंबाचा गाडा कसाबसा हाकत असतात ,कुटुंब पासून दूर राहून वाहन चालवत असतात, अशा कायद्यांमुळे वाहन चालकांचा कंबर तोडण्याचा काम आणि बेकारी वाढवण्याचा काम केंद्र सरकार करीत असून तो तुरंत रद्द करावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी शहर व तालुक्याच्या वतीने जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, युवक तालुका अध्यक्ष शिलामणी बनसोडे, जिल्हा संघटक देवानंद अस्वले, तालुका महासचिव गौतम गायकवाड,शहराध्यक्ष विशाल ठोंबरे, सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका अध्यक्ष रवी पोटे ,शहर महासचिव भारत देडे, मिरजगीचे पाटील गेनू पाटील युवक आघाडी शहराध्यक्ष संदीप बाळशंकर, कंटेहळीचे बाबूलाल ताची आदि मान्यवर उपस्थित होते..
