अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या महाप्रसादाच्या सेवेबरोबरच विविध उपक्रम हे धाडशी नेतृत्व व प्रबळ इच्छाशक्तीमुळेच न्यासाचा प्रचंड विस्तार होत आहे. न्यास हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लौकिक असून, धार्मिक व सांस्कृतीकतेचे प्रतिक :आमदार टी. राजा सिंह
आमदार सचिन कल्याणशेट्टी व मंडळाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,

अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या महाप्रसादाच्या सेवेबरोबरच विविध उपक्रम हे धाडशी नेतृत्व व प्रबळ इच्छाशक्तीमुळेच न्यासाचा प्रचंड विस्तार होत आहे. न्यास हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लौकिक असून, धार्मिक व सांस्कृतीकतेचे प्रतिक :आमदार टी. राजा सिंह


*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या महाप्रसादाच्या सेवेबरोबरच विविध उपक्रम हे धाडशी नेतृत्व व प्रबळ इच्छाशक्तीमुळेच न्यासाचा प्रचंड विस्तार होत आहे. न्यास हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लौकिक असून, धार्मिक व सांस्कृतीकतेचे प्रतिक असल्याचे मनोगत तेलंगणा येथील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी व्यक्त केले.*

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात आले असता आमदार सचिन कल्याणशेट्टी व मंडळाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना आमदार टी. राजा सिंह म्हणाले की, श्री स्वामी समस्र्थ अन्नछत्र मंडळाची कार्य भक्ताभिमुख असल्याने आलेल्या स्वामी भक्त हा न्यासाला भेट देऊन महाप्रसाद घेतोच, भक्तांसाठी केलेल्या आवश्यक सोयीसुविधा ह्या गरज ओळखून मांडणी करण्यात आलेले आहे. म्हणूनच संपूर्ण परिसर हा स्वच्छ व सुंदर असून, न्यासाची बांधणी उत्तमरित्या केली आसल्याचे मनोगत आमदार टी. राजा सिंह यांनी व्यक्त केले. त्यांच्या समवेत आमदार सचिन कल्याणशेट्टी, मिलन कल्याणशेट्टी, योगेश पवार, ऋषी लोणारी, राजकुमार झिंगाडे, नागेश कलशेट्टी हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, एस.के.स्वामी, सिद्धराम कल्याणी, बाळासाहेब घाडगे, कल्याण देशमुख, प्रविण घाटगे, निखील पाटील, सौरभ मोरे, वैभव मोरे, सुमित कल्याणी, गोविंद शिंदे, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.