विज्ञान प्रदर्शनात मंगरूळे प्रशालेच्या उदय उमाटेची राज्यस्तरावर निवड.
दिनांक 4 व 5 जानेवारी रोजी ज.रा. चंडक महाविद्यालय, बाळे सोलापूर येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले

विज्ञान प्रदर्शनात मंगरूळे प्रशालेच्या उदय उमाटेची राज्यस्तरावर निवड.

सोलापूर येथील ज.रा. चंडक महाविद्यालयात संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात के. एल. ई. संचलित मंगरुळे प्रशालेचा विद्यार्थी उदय रमेश उमाटे याच्या आटोमॅटिक वॉटरिंग टू द प्लांट्स आन हायवे डिवाइडर ( Automatic Watering to Plants on Highway Divider) या वैज्ञानिक उपकरणाची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे.
दिनांक 4 व 5 जानेवारी रोजी ज.रा. चंडक महाविद्यालय, बाळे सोलापूर येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. त्या विज्ञान प्रदर्शनात उदय उमाटे या विद्यार्थ्यांची उच्च प्राथमिक गटातून प्रथम क्रमांकाने राज्यस्तरावर निवड झाले असून जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे , गणिततज्ञ ह. ना.जगताप , विज्ञान विषयात देश पुरस्कार विजेते सिद्धेश्वर म्हेत्रे , माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे ,
चंडक महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन ठोकळ , उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक राजशेखर नागणसूरे , माजी जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक श्री अशोक भांजे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
यापुर्वीही प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 5 उपकरणाची निवड राज्यस्तरावर झाली असून 1 वेळा देशपातळीवर सुद्धा निवड झाली आहे.
उदय उमाटे यास विज्ञान विभाग प्रमूख महांतेश मठपती, रमेश उमाटे व इतर विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. के.एल.ई. संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे , शालेय समिती चेअरमन अनिल पट्टेद ,
शालेय समिती सदस्य अँड.अनिल मंगरुळे, प्रशालेचे मुख्याध्यापक नंदाजी कदम, उप मुख्याध्यापक मल्लिनाथ पाटील, पर्यवेक्षिका आरती तोळणूरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
———————————————
——-उपकरणाचे प्रमुख वैशिष्ट्ये ——-
देशभरामध्ये महामार्गावर हजारो किलोमीटरचे दुभाजक असून त्याच्यावर वाढणारी वनस्पती रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यास मदत करते. परंतु व्यवस्थित देखभाल नसल्याने त्या वनस्पतींची वाढ नीट होत नाही . त्याकरिता त्या दुभाजकावर स्वयंचलित मोटरच्या साह्याने पाणीपुरवठा करणारी यंत्रणा निर्माण करणे हे या उपकरणाचे वैशिष्ट्य आहे.
जमीन कोरडी असल्यास मोटार पंप चालू होईल व सर्व जमीन ओली झाल्यास पंप बंद होईल. त्यामुळे पाण्याची बचत होईल, वनस्पतींची वाढ चांगली होऊन जैवविविधतेत भर पडेल.
——————————————-
