जोगेश्वरी पुर्व श्री समर्थ विदयालातील मुलांना दिवाळी निमित्त स्कूल बॅग व मिठाई वाटप
सामाजिक बांधिलकी

जोगेश्वरी पुर्व श्री समर्थ विदयालातील मुलांना दिवाळी निमित्त स्कूल बॅग व मिठाई वाटप

सुभाष मूळे
पुणे प्रतिनिधी


जोगेश्वरी पूर्व येथील श्री समर्थ विद्यालय माध्यमिक व श्रीमती लक्ष्मीबाई वळंजू प्राथमिक शाळेतील जवळपास २७० विधर्थ्यना दिवाळी सणानिमित स्कूल बॅग, मिठाई बॉक्स, पेन-पेन्सिल वाटप कारण्यात आले


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक नेते जनार्दन जंगले, शिवाजी कुलाळ,जोगेश्वरी विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, शाखाप्रमुख अजित भोगले, लोकमत चे वरिष्ठ पत्रकार मनोहर कुंभेजकर, समाजसेविका सुरक्षा घोसाळकर, आदर्श शिक्षक हेमंत चौधरी, सेवानिवृत्त प्रिन्सिपॉल मधुबाला जंगले, सेवानिवृत्त अधिकारी उदय रेगे, समर्थ शाळेचे ट्रस्टी सुनील नलावडे, प्रभाकर मीराशी, आदी मान्यवर उपस्थित होते.जॉय चे काम वर्षभर सुरूच असते व या निमित्ताने विधार्थ्य पासून ते वयोवृद्ध सर्वांनाच मदत करण्यात येते असे अध्यक्ष गणेश हिरवे म्हणाले.या शाळेत येणारी मुलं ही आरे आदिवासी पाडे आणि सर्वसामान्य गरिब कुटुंबातील असली तरी अभ्यासात व खेळात हुशार आहेत.जॉय संस्था मागील पाच सहा वर्षपासून विविध मध्यममातून आमच्या मुलाना मदत करीत असल्याचे प्रिन्सिपॉल मधुकर पोर्लेकर म्हणाले.विशेष पाहुणे म्हणून कुर्ला गांधी बाल मंदीर शाळेतील विश्वनाथ पांचाळ व उत्तम कोळंबेकर हे आदर्श शिक्षक उपस्थित होते. मुलांना वस्तू वस्तू वाटप करण्यासाठी असुंता डिसोझा, मीना भूतकर, चंद्रशेखर सावंत, भूषण मुळये, सुनील चव्हाण, अविनाश करगुटकर, ज्ञनेश्वर परब, रोशनी ठोकळे आदि जॉय चे कार्यकर्ते वेळातवेळ काढून हजर होते.जॉय करीत असलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन शाखाप्रमुख अजित भोगले यांनी संस्थेला दहा हजार रु धनादेश दिला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन राजापकर सरांनी केले.