
वृद्धसोबत साजरा करणार सुवर्ण महोत्सवी वाढदिवस

सुभाष मुळे
पुणे प्रतिनिधी

जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे हे २७ जानेवारी रोजी वयाची ५० वर्ष पूर्ण करणार असून आपला सुवर्णरुपी वाढदिवस ते मीरारोड काशिगाव स्थित रुपेश पाटील संचालित नित्यानंद वृध्दश्रमातील वृध्दना अन्नदान करून साजरा करणार आहेत.यावेळी हिरवे यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार असून ज्येष्ठाशी ते संवाद साधून त्यांची सुख दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.हिरवे यांचे काम छान असल्याचे अनेक मान्यवरांनी वेळेवेळी बोलून दाखविलेले असून त्यांचे कौतुक केलेलं आहे. त्यांना आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामासाठी अनेक पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत.सध्या हिरवे सर त्यांच्या जॉय संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात.
