आधुनिक पद्धतीने अमेरिकन झुकिनीचा यशस्वी प्रयोग.
झुकिनी काकडी वर्गीय शेती - पुणे जिल्ह्यातील, तालुका खेड, मांजरेवाडी पिंपळ गावच्या शिवारात अविनाश लक्ष्मण मांजरे यांनी 20 गुंठ्यामध्ये काकडी वर्गीय प्रकार अमेरिकन झुकिनीची लागवड केली आहे.

आधुनिक पद्धतीने अमेरिकन झुकिनीचा यशस्वी प्रयोग.

झुकिनी काकडी वर्गीय शेती – पुणे जिल्ह्यातील, तालुका खेड, मांजरेवाडी पिंपळ गावच्या शिवारात अविनाश लक्ष्मण मांजरे यांनी 20 गुंठ्यामध्ये काकडी वर्गीय प्रकार अमेरिकन झुकिनीची लागवड केली आहे.

अविनाश मांजरे या शेतकऱ्याने पारंपारिक शेतीला छेद देत भरघोस उत्पन्न मिळवून देण्याच्या पिकांचा अभ्यास केला.
व त्यातून त्यांनी या अमेरिकन झुकनी पिकाची निवड केली.
त्यानुसार अतिशय उत्तम व्यवस्थापन करत संपूर्ण शेतात ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था केली.
तसेच पाणी सोडण्यासाठी ची मोटर चालू बंद करण्यास मोबाईलद्वारे ऑपरेट करण्यात येते.
यातून वेळेचे व्यवस्थापन आणि श्रम व पैशाची बचत साधण्यात आली.

या ठिबक द्वारेच पाण्याबरोबर खते औषधे विरघळवून सोडली जातात.
बी बियाणे साधारण 6500 रुपये खरेदी करून त्यांची 20 गुंठ्यात लागवड केली.
तसेच खते व औषध फवारणीसाठी साधारणतः 15,000 ते 20,000 खर्च आला.
त्यानंतर ठिबक सोबतच मल्चिंग पेपर पसरवल्याने खुरपणीचा प्रश्न उरत नाही.
लागवडीनंतर महिनाभराने साधारणतः तोडणी चालू होते व 40 दिवस दररोज त्याची तोडणी होते.
दररोज 120 ते 150 किलो उत्पादन निघते.
पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये भरून नजीकच्या मार्केटमध्ये माल पाठवला जातो.
तिथून मुंबईच्या दादर मार्केटमध्ये मालाची विक्री होते.
मालाला सरासरी 50 ते 90 रुपये प्रति किलो भाव मिळतो.
अतिशय कमी खर्चात उत्तम व्यवस्थापनाद्वारे भरघोस उत्पन्न देणाऱ्या झुकीनीचा यशस्वीरित्या प्रयोग अविनाश मांजरे या शेतकऱ्याने करून दाखवला आहे. नक्कीच इतर शेतकरी बांधवांसाठी हे प्रेरणादायी ठरणार आहे.
