गावगाथा

Navardev Bsc Agri: शेतकरी राजाची गोष्ट मांडणाऱ्या ‘नवरदेव Bsc Agri’चा ट्रेलर रिलीज, चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

२६ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे

Navardev Bsc Agri: शेतकरी राजाची गोष्ट मांडणाऱ्या ‘नवरदेव Bsc Agri’चा ट्रेलर रिलीज, चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

Navardev Bsc Agri Trailer out: अभिनेता क्षितिज दाते आणि अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर यांचा नवरदेव Bsc Agri हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती देखील मिळते. आगामी मराठी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. अशताच आता अभिनेता क्षितिज दाते (Kshitij Date) आणि अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) यांचा नवरदेव Bsc Agri हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
शेतकरी राजाची गोष्ट मांडणारा ‘नवरदेव Bsc Agri’
नवरदेव Bsc Agri या चित्रपटात शेतकरी राजाची गोष्ट मांडण्यात आली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की गावातील एका तरुणाला शेतीमध्ये विविध प्रयोग करायचे असतात. अशातच या तरुण्याचे कुटुंब त्याचं लग्न लावून देण्याची तयारी करत असतात. शेतकऱ्याला लग्न करताना कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागतं? तसेच मुलीच्या कुटुंबाच्या आपेक्षा शेतकरी तरुण पूर्ण करु शकतो की नाही? हे नवरदेव Bsc Agri या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

चित्रपटाची स्टार कास्ट
नवरदेव Bsc Agri या चित्रपटात मकरंद अनासपुरे , क्षितिज दाते, प्रविण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर,गार्गी फुले, रमेश परदेशी,नेहा शितोळे, हार्दिक जोशी,तानाजी गलगुंडे, अनिरुद्ध खुटवड या कलाकारांनी काम केलं आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण संजीवकुमार हिळ्ळी यांनी केले आहे
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये इतर कलाकारांची झलक देखील बघायला मिळते.

HTML img Tag Simply Easy Learning    

कधी रिलीज होणार चित्रपट?
नवरदेव Bsc Agri हा चित्रपट 26 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असून या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. प्रियदर्शिनी इंदलकरनं या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला कमेंट करुन अनेकांनी ट्रेलरचं कौतुक केलं आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रियदर्शिनी इंदलकरला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातील प्रियदर्शिनीच्या विनोदी शैलीचं अनेक जण कौतुक करतात. तसेच ‘लोकमान्य’ या मालिकेतून क्षितिज दाते हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता क्षितिज दाते आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या नवरदेव Bsc Agri या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button