गावगाथाठळक बातम्या
Akkalkot: जिल्हा सञ न्यायालयच्या वरिष्ठ लिपीक पदी उमेश बिराजदार यांची नियुक्ती

अक्कलकोट (प्रतिनिधी): अक्कलकोट तालुक्यातील बोरी उमरगे येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या उमेश मल्लिकार्जुन बिराजदार यांची जिल्हा सञ न्यायालय, सोलापुर येथे वरिष्ठ लिपीक या पदावर नियुक्त करण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

मल्लिकार्जुन बिराजदार (वडील ) हे अत्यंत गरिबी परिस्थितीतून नवी मुंबई येथील भाजी मंडई मध्ये मिळेल ते काम करून उमेश व महेश या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले.एक मुलगा अक्कलकोट पोष्ट खात्यात कार्यरत असून आत्ता उमेश हे जिल्हा सञ न्यायालय, सोलापुर येथे वरिष्ठ लिपीक या पदावर नियुक्त झाल्याबद्दल उमरगे या पंच क्रोशीतील जनतेने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
