गावगाथा

पंडित पंचगल्ले यांनी वार शोधणारे बनवले कोष्टक

दहा दशकांतील दिनदर्शिका एका कोष्टकात सामावण्याची किमया दिग्रस, ता. कंधार येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंडित नागनाथ पंचगल्ले यांनी साधली

पंडित पंचगल्ले यांनी वार शोधणारे बनवले कोष्टक

मुरुम, ता. उमरगा, ता. ११ (प्रतिनिधी) : दहा दशकांतील दिनदर्शिका एका कोष्टकात सामावण्याची किमया दिग्रस, ता. कंधार येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंडित नागनाथ पंचगल्ले यांनी साधली आहे. इ. स. १ ते ९९९९ या कालावधीतील कोणत्याही तारखेचा वार या कोष्टकाच्या साहाय्याने शोधता येतो. बऱ्याच वेळा काही वर्षातील किंवा येणाऱ्या वर्षातील वार आणि तारीख शोधण्याची उत्सुकता अनेकांना असते, पण ते शोधायचे कसे, हे कळत नाही. अशावेळी हे कोष्टक मार्गदर्शक ठरणार आहे. श्री. पंचगल्ले मूळचे नांदेडचे कंधार तालुक्यातील दिग्रस येथे त्यांनी गणिताचे शिक्षक म्हणून काम केले होते. मुख्याध्यापक म्हणून ते सध्या सेवानिवृत्त झाले. मुलगा व सून यांच्या नोकरीसाठी सेवानिवृत्तीनंतर कोल्हापूर येथील वास्तव्यास आहेत. येथे बसून वेळ जाने मुश्किल होते. यावर पर्याय शोधत त्यांनी गणितातील अंकाशी दोस्ती केली. रोज काहीतरी नवीन आकडेमोड करत ते वेळ व्यतित करत होते. अनेक वेळा त्यांनी गणित परिषदेत सहभाग घेतला होता. त्या परिषदेमध्ये एक मुलगा कोणत्याही वर्षातील तारखेला कोणता वार येईल, याची माहिती सांगत होता. त्याने हे नेमके कसे साधले असेल, याचा विचार ते करत होते. या वर्षीच्या डिसेंबरमध्ये त्यांनी या पद्धतीचे कोष्टक तयार करण्यास सुरुवात केली आणि आठ दिवसात त्यांनी दहा दशकातील कोणत्याही तारखेचे वार शोधणारे कोष्टक बनविण्याची किमया साधली. सदर कोष्टकानुसार आपणाला वार कसा शोधावा याची सोपी माहिती या कोष्टकात दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button