गावगाथा

वागदरी कन्नड शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बसवराज उमराणे व उपाध्यक्षपदी प्रकाश पोमाजी यांची निवड

शाळा व्यवस्थापन समिती

वागदरी कन्नड शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बसवराज उमराणे व उपाध्यक्षपदी प्रकाश पोमाजी यांची निवड…

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

वागदरी – अक्कलकोट तालुक्यातील वागदरी कन्नड शाळेत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी बसवराज उमराणे तर उपाध्यक्षपदी प्रकाश पोमाजी यांची एकमताने निवड करण्यात आली.
शनिवारी सकाळी मुख्याध्यापक बसवराज मुनोळी यांनी बोलावलेल्या समितीच्या नियुक्त सदस्यांचे बैठकीत केंद्रप्रमुख बापूराव चव्हाण यांनी पुढील दोन वर्षांसाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी दोन नावांची एकमताने निवड केली. बाकी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. यापूर्वी झालेल्या पालक सभेत 14 सदस्यीय समिती पैकी निम्मी समिती महिलांसाठी राखीव असून दोन सदस्यांची वर्गनिहाय निवड करण्यात आली होती. आज अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली.
निवड झालेल्या दोघांचा केंद्रप्रमुख बापूराव चव्हाण यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तर उर्वरित सदस्यांचा शाळेतील शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सन्मान स्वीकारताना नूतन अध्यक्ष बसवराज उमराणी यांनी शाळेच्या प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितले.
समिती चे सदस्य नागेश ठोंबरे, राजकुमार पोमाजी, बसवराज उमरणी,सोमा ठोंबरे, मंजुता ठोंबरे, सुनीता वमने , विजयलक्ष्मी कलशेट्टी, रेखा लोहारा,जयश्री मुनोळी,सिद्धराम भैरामडगी, प्रभाकर ठोंबरे, महादेव वागदरगी परमेश्वर ऐदुड्डे आदी सदस्य तर शाळेतील शिक्षक शिवानंद गोगाव, परमेश्वर मुनोळी, सिद्धाराम होदालूरे, बसवराज गायकवाड व श्रीशैल लोहार उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button