*अक्कलकोट महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळांच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पोळ,उपाध्यक्षपदी विजय उर्फ गोटू माने यांची निवड…*
निवड नियुक्ती

*अक्महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळांच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पोळ,उपाध्यक्षपदी विजय उर्फ गोटू माने यांची निवड…*


*🔶अक्कलकोट :* दि.१५, (प्रतिनिधी)
*महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळाने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व मंडळाचे आधारस्तंभ जन्मेजयराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, सुरेशचंद्र सुर्यवंशी, बाबासाहेब निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवजन्मोत्सवच्या पदाधिकाऱ्यांची निवडी संपन्न झाल्या. अध्यक्षपदी – बाळासाहेब पोळ, उपाध्यक्षपदी – विजय उर्फ गोटू माने यांची एक मताने निवड करण्यात आली.*

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येते. यंदा देखील जय्यत तयारी सुरु झाली आहे. याकरिता सोमवारी राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ या मार्गावरील श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या सर्जेराव जाधव सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष निखील पाटील हे होते.

सदर पदाधिकारी निवड ही सोलापूर सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक माऊली पवार, प्रा.गणेश देशमुख, रवी मोहिते, अनंतनेता जाधव, अँड. श्रीरंग लाळे, जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी, शिवाजीराव पाटील, अमोलराजे भोसले, महेश इंगळे, बाबासाहेब निंबाळकर, तम्मा शेळके, प्रकाश पडवळकर, बाळासाहेब मोरे, अमर शिंदे, सुभाष गडसिंग, सुधाकर गोंडाळ, अरुण साळुंखे, मोहनराव चव्हाण, पिंटू सोनटक्के आदिजनांच्या उपस्थित संपन्न झाली. नूतन अध्यक्षपदी बाळासाहेब पोळ व उपाध्यक्षपदी विजय उर्फ गोटू माने यांची एकमताने निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर प्रतिष्ठापना जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात मिरवणूकीने छत्रपती शिवरायांच्या सिंहारुढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष बाळासाहेब पोळ व उपाध्यक्ष विजय उर्फ गोटू माने यांनी सांगितले.

यावेळी मनोज निकम, वैभव नवले, बालाजी जाधव, प्रशांत भगरे, अतुल जाधव, निखील पाटील, शीतल जाधव, बाळासाहेब पोळ, गोटू माने, राजेंद्र सूर्यवंशी, वरून शेळके, विजय पाटील, रवी कदम, बालाजी पाटील, महेश दनके, अतिश पवार, माणिकराव बिराजदार, दयानंद काजळे, रणजीत गोंडाळ, सागर गोंडाळ, रोहित खोबरे, मनोज इंगोले, श्रीकांत झिपरे, योगेश पवार, केदार तोडकर, विशाल कलबुर्गी, फहीम पिरजादे, सनी सोनटक्के, गोविंदराव शिंदे, स्वामीराव मोरे, भरत राजेगावकर, विकी गडदे, पिंटू साठे, राजू शिंदे, प्रदीप सुरवसे, प्रथमेश पवार, वैभव मोरे, अरुण टोणपे, विजय इंगळे, माणिकराव पवार, शुभम कामळूरकर, यशवंतराव भोसले, अनाद पवार, राहुल शेळके, सुभाष सुरवसे, आकाश शिंदे, प्रसाद मोरे, महेश भोसले, नितीन शिंदे, चंद्रशेकर वाकडे, मुन्ना कोल्हे, रोहित निंबाळकर, ऋषिकेश चव्हाण, गणेश पाटील, रमेश शिंदे, आबा सूर्यवंशी,आकाश सूर्यवंशी यांच्यासह तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन, आभार प्रा.प्रकाश सुरवसे यांनी मानले.