मकर संक्रांती निमित्त आ.पडळकरांनी स्वामींना वाहिले तिळगुळ
वटवृक्ष मंदिरात आ.गोपीचंद पडळकरांचा महेश इंगळेंनी केला सन्मान

मकर संक्रांती निमित्त आ.पडळकरांनी स्वामींना वाहिले तिळगुळ

वटवृक्ष मंदिरात आ.गोपीचंद पडळकरांचा महेश इंगळेंनी केला सन्मान

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१५/१/२४) आज मकर संक्रांती निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. ते नुकतेच आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन नूतन वर्षानिमित्त व मकर संक्रांती निमित्त स्वामी समर्थांना तिळगुळ वाहून स्वामींचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी बोलताना पडळकर यांनी मंदिर समितीचे पारदर्शक कामकाज व महेश इंगळे यांचे समर्पित सेवाभाव पाहून मला नेहमीच हेवा वाटत आहे, असे सांगून नूतन वर्ष व मकर संक्रांति निमित्त स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याकरिता आज स्वामींचे चरणी नतमस्तक झालो असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, ऋषिकेश लोणारी, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, आदिसह स्वामीभक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – वटवृक्ष मंदिरात आमदार पडळकर यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
