गावगाथा

सेंट टेरेसा शाळेत संक्रांती निमित्त विशेष प्रार्थना सभेचे आयोजन

विशेष उपक्रम

सेंट टेरेसा शाळेत संक्रांती निमित्त विशेष प्रार्थना सभेचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

वांद्रे येथील सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल या शाळेत नुकतेच मकर संक्रांती निमित्त एका विशेष प्रार्थना सभेचं आयोजन यशस्वी रित्या करण्यात आलं होत. यावेळी इयत्ता सहावी ब च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका प्रिया हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संक्रांत संस्कृती जपणारं ” तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला ” हे गाणं सादर केलं.ही शाळा जरी कॅथलीक असली तरी येथे विविध जाती धर्माचे अनेक सण उत्सव मोठ्या सलोख्याने, उत्साहाने, आनंदाने साजरे करण्यात येतात.यावेळी उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आणि स्टाफ ला तिळाचे लाडू वाटण्यात येऊन नवीन वर्षाचा पहिलाच सण म्हणून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.शाळेचे मुख्या्ध्यापक फादर निकी, अडमिन ऑफिसर फादर शिनोय, उपमुख्यध्यापिका टीचर निकुल डिसोजा, पर्यवेक्षक सर फिलिप रोड्रीक्स आदी मान्यवरांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून सर्वांना शाबासकी दिली.कार्यक्रमाच्या शेवटी सर साहिल यांनी संक्रांती निमित्त उडविण्यात येणाऱ्या पतांगासाठी जो धारदार नायलॉन मांजा वापरण्यात येतो तो खूपच घातक असून यामुळे अनेक पशू-पक्षी, जनावरे, माणसं यांच्या जीवावर बेतून यातून कधीकधी नाहक प्राणही गमवावे लागतात..तेव्हा नायलॉन मांजा न वापरता साधा धाग्याने देखील आपण पतंग उडवून आनंद घेऊ शकतो आणि नायलॉन मंज्यावर सरसकट बंदी असायला हवी याबद्दल सूतोवाच केलं.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button