गावगाथा

अक्कलकोट शहरातील विविध विकास कामाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार, दि.१९ जानेवारी रोजी संपन्न होणार

अक्कलकोट वासियाच्या वतीने मानपत्र देऊन देवेंद्र फडवणीस यांची आभार व्यक्त करण्यात येणार आहे.

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
अक्कलकोट शहरातील विविध विकास कामाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार, दि.१९ जानेवारी रोजी संपन्न होणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट येथील ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिराच्या पुन:र्निर्माणसाठी ४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम व अक्कलकोट नूतन बस स्थानकासाठी २९ कोटी रुपये मंजुर झालेल्या बांधकामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. ना.देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी ४ वाजता एम.एस.ई.बी चौकात आगमन होणार आहे व एस.टी.स्टँड पर्यंत रोड शो संपन्न होणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

दि. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता राजे फत्तेसिंह क्रीडांगण ए-वन चौक अक्कलकोट येथे तमाम अक्कलकोट वासियाच्या वतीने मानपत्र देऊन देवेंद्र फडवणीस यांची आभार व्यक्त करण्यात येणार आहे. तसेच जाहीर सभा होणार असून, यास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी, खा.रणजीतसिंह निंबाळकर, आ.सुभाष देशमुख, आ.विजयकुमार देशमुख, आ.राजेंद्र राऊत, आ.राम सातपुते, आ.रणजीतसिंह मोहिते-पाटील, आ.समाधान आवताडे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, माजी आ.प्रशांत परिचारक यांच्यासह भाजपा महायुतीतील नेते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित रहावे असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button