गावगाथा

महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेच्या अनुषंगाने झालेल्या अनुचित प्रकारची पोलीस विभाग सखोल चौकशी करेल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

राष्ट्रीय लिंगायत महामंचच्यावतीने सोलापूर बंद मागे....

महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेच्या अनुषंगाने झालेल्या अनुचित प्रकारची पोलीस विभाग सखोल चौकशी करेल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

राष्ट्रीय लिंगायत महामंचच्यावतीने सोलापूर बंद मागे….

सोलापूर:- राष्ट्रीय लिंगायत महामंचच्यावतीने सोलापूर शहर व जिल्हा बंद दि. १९ जानेवारी रोजी पुकारण्यात आला होता. विश्वगुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे विटंबन झाल्यामुळे महाराष्ट्रातील लिंगायत समाजामध्ये प्रचंड रोष व चीड निर्माण झाली होती. लिंगायत समाजाच्या भावना दुखविल्यामुळे बंदची हाक देण्यात आली होती. राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी गंभीर दखल घेवून सोलापूर चे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना आदेश देवून या प्रकरणाबाबत योग्य ते कायदेशीर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात शिवसेनाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी सोलापूर ग्रामीण हद्दीतील रे नगर गृहनिर्माण सोसायटीच्या कुंभारी

येथील कार्यालयात राष्ट्रीय लिंगायत मंचचे पदाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यात यशस्वी शिष्टाई केली. सदर शिष्टमंडळास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शिष्टमंडळास आश्वाशीत केले की, या प्रकरणात मी स्वतः जातीने लक्ष घालून महात्मा बसवेश्वर प्रतिमेची विटंबना करणाऱ्या समाजकंटका विरुध्द कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. आणि तात्काळ पोलीस प्रशासनाला याबाबत सखोल चौकशी करुन अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करावा असे आदेश दिले. व मा. पोलीस प्रशासनाकडून सुध्दा बंद मागे घेवून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

यामुळे राष्ट्रीय लिंगायम महामंचचावतीने पुकारण्यात आलेला सोलापूर बंद मागे घेण्यात आल्याचे माहिती राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी पत्रकान्वये जाहीर केले. या शिष्ट मंडळात राष्ट्रीय महासचिव सकलेश बाभुळगांवकर, सुधाकर कोरे, राधाकृष्ण पाटील, राजकुमार व्हनकोरे, श्रीशैल शेट्टी, नामदेव फुलारी, बसवराज स्वामी, अशोक धुळराव, सचिन तुगावे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आज रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्हा माहिती अधिकार सुनिल सोनटक्के यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदन प्रसारमाध्यमाद्वारे जाहीर केले. खालीलप्रमाणे –

श्री शिवयोगी सिध्द्रामेश्वर दुसऱ्या दिवशीच्या यात्रा दि.१५ जानेवारी २०२४ रोजीच्या होम व भाकणूक मिरवणूकीप्रसंगी बैलगाडीच्या रथात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर व महात्मा बसवेश्वर महाराज यांचे प्रतिमा ठेवून मिरवणूक निघालेली होती. त्या मिरवणूकीमध्ये अज्ञात समाजकंटकाने महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवण्यात आले. जसे मिरवणूक पुढे पुढे जात होते. त्या दरम्यान बसवेश्वरांचे प्रतिमा मिरवणूकीमधून काढून टाकण्यात आली. या प्रकरणी मंदीर पंच कमिटीकडे विचारणा केली असता, याबाबत आम्हाला कोणतीच माहिती नाही, असे सांगण्यात आले, असे निवेदन राष्ट्रीय लिंगायत महासंघ भारत संघटनेकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. उपरोक्त घटनेमुळे लिंगायत समाजामध्ये रोष निर्माण झालेला आहे. तरी असे कृत्य करणाऱ्या सर्व संबंधिताची पोलीस विभाग सखोल चौकशी करेल व संबंधिता विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. तरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी शांतता पाळावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

सोलापूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा असून जिल्ह्यात आज पर्यंत सर्व सण, उत्सव, समारंभ व मिरवणुका अत्यंत शांततामय वातावरणात पार पडत असतात, या पुढे असेच शांततामय वातावरण रहावे, असे आवाहन सर्व समाजातील नागरिकांना करत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

राष्ट्रीय लिंगायम महामंचकडून सर्व लिंगायत समाजांना शांतता व सोलापूरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button