गावगाथा

लढवय्या नेता आणि कष्टकऱ्यांची घरे!

लढवय्या नेता म्हणून ओळख असणाऱ्या नरसय्या आडम मास्तरांनी ३० हजार कष्टकऱ्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकार केले.

लढवय्या नेता आणि कष्टकऱ्यांची घरे!

HTML img Tag Simply Easy Learning    

लढवय्या नेता म्हणून ओळख असणाऱ्या नरसय्या आडम मास्तरांनी ३० हजार कष्टकऱ्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकार केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

विडी कामगार, ऑटोरिक्षा चालक, भाजीविक्रेते, गिरणी कामगार, मेकॅनिक अशा हातावरचं पोट असणाऱ्यांना इथे कायमस्वरूपी छत-निवारा मिळाला आहे, त्यासाठी आडममास्तरांनी वीस वर्षे संघर्ष केला. केंद्रात त्यावेळी सत्तेवर असणाऱ्या केवळ काँग्रेस सरकारशीच नव्हे तर स्वपक्षीयांशीही त्यांना लढावे लागले. या ३० हजार घरांचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच झाले होते. त्या समारंभात आडम मास्तरांनी या योजनेला सहकार्य केल्याबद्दल मोदींचे कौतूक केले, त्या मुद्द्यावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय झाला. पक्षाचा हा कारवाईचा निर्णय आडममास्तरांनी उमद्या मनाने स्वीकारला. पक्षशिस्त महत्त्वाचीच आहे, पण कामगारांना स्वतःची घरे मिळत आहेत, हेही तितकेच महत्त्वाचे आहे, म्हणून शिस्तीला मुरड घातल्याचे सांगितले होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

विशेष म्हणजे, रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाचे मूळ नाव राजीव गांधी आवास योजना असे आहे. (संदर्भ – रवींद्र मोकाशी). असंघटित क्षेत्रातील व्यक्तींसाठी पंतप्रधान आवास योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ या प्रकल्पाला झाला आहे. कालांतराने राजीव गांधी यांचे नाव मागे पडून रे नगर असे नामाभिधान रूढ झाले.

HTML img Tag Simply Easy Learning    

रे नगरातील मालकी घरातील महिलेची असेल, पुरूषाची नव्हे. दारावर तिची नेमप्लेट असेल, ही मोठी गोष्ट आहे. जगातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पातील प्रत्येक घराची मालकीण स्त्री असेल हाही एक विक्रम आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

३० हजार घरांमध्ये प्रत्येकी चार माणसे गृहित धरली तरी एक लाख वीस हजार लोकवस्तीचे हे आधुनिक गावच झाले आहे. बँकेपासून दैनंदिन गरजा भागवणाऱ्या दुकानांपर्यंत आणि सरकारी कार्यालयांपासून शाळेपर्यंत सगळ्या सुविधा येथे आहेत.

रे नगरमुळे सोलापूरचे नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चर्चेत आहे, असेल. आडममास्तरांचे कर्तृत्वही सर्वांच्या स्मरणात कायम राहिल. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासातही या विक्रमाची नोंद पक्की राहणार आहे… आडम मास्तरांचे अभिनंदन !

– रजनीश जोशी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button