बुद्ध पौर्णिमेनिमित्त अनेक भाविक स्वामी चरणी नतमस्तक
बुद्ध पौर्णिमेनिमित्त अनेक भाविक स्वामी चरणी नतमस्तक

बुद्ध पौर्णिमेनिमित्त अनेक भाविक स्वामी चरणी नतमस्तक

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.५/५/२३) आज बुद्ध पौर्णिमेनिमीत्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात असंख्य स्वामी भक्त श्रीचे दर्शन घेत स्वामी चरणी नतमस्तक झाले. ब्रम्हांडाचे नायक म्हणून स्वामींकडे व
स्वामी समर्थांचे मुळस्थान असलेल्या या वटवृक्ष मंदिराकडे पाहण्याचा भाविकांचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे आज असंख्य स्वामीभक्त भर उन्हातही स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केल्याने ब्रम्हांडनायकाच्या दर्शन भेटीची ओढ काय असते याची प्रचिती आज बुद्धपौर्णिमेदिवशी मंदिर समितीसह समस्त भाविकांनी अनुभवली. बुध्द पौर्णिमेनिमीत्त मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चोळप्पा महाराजांचे वंशज मंदिराचे पुरोहित मोहन पुजारी, मंदार पुजारी यांच्या हस्ते पहाटे ५ वाजता काकड आरती तर दुपारी ११:३० वाजता नैवेद्य आरती संपन्न झाली. पहाटे ५ वाजता मंदिर भाविकांना दर्शनाकरिता मंदीर खुले करण्यात आले. नैवेद्य आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले. स्वामी भक्तांच्या दर्शन रांगेची सोय मंदिराच्या दक्षिण महाद्वार परिसरात कापडी मंडप उभारून व शेडमध्ये व मंदीर परिसरात बॅरेकेटिंग करून करण्यात आली होती.
सकाळी ७ नंतर भाविकांची गर्दी वाढत गेली ती रात्री १० वाजेपर्यंत भाविकांच्या वाढत्या ओघामुळे कायम राहिली. स्वामी भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे नैवेद्य आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना टप्या टफ्याने दर्शनास सोडण्यात आले. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, रवी मलवे, गिरीश पवार, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, ऋषिकेश लोणारी, शिवाजी यादव, महेश मस्कले, मनोज जाधव, अमर पाटील, संतोष पराणे व देवस्थानचे कर्मचारी / सेवेकऱ्यांनी तसेच पोलीस प्रशासनाने परिश्रम घेतले.

फोटो ओळ – पौर्णिमेनिमीत्त स्वामींची सजविलेली मूर्ती व स्वामी दर्शनाकरिता भाविकांनी केलेली गर्दी दिसत आहे.
