गावगाथा

श्री स्वामी समर्थांच्या सेवा कार्यातून अक्कलकोटचा विकास हे माझे ध्येय : अक्कलकोट संस्थान नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ *अनुभूती* प्रकल्प सादरीकरणप्रसंगी व्यक्त केले.

राजघराण्याच्या राम तलाव या निसर्गरम्य परिसरात ४२ एकरात हा प्रकल्प साकारला जाणार असून या ठिकाणी १०८ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची मूर्ती स्थापना केली जाणार आहे.

श्री स्वामी समर्थांच्या सेवा कार्यातून अक्कलकोटचा विकास हे माझे ध्येय : अक्कलकोट संस्थान नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ *अनुभूती* प्रकल्प सादरीकरणप्रसंगी व्यक्त केले

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (विशेष प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थांच्या सेवा कार्यातून अक्कलकोटचा विकास हे माझे ध्येय आहे असे प्रतिपादन अक्कलकोट संस्थान नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ *अनुभूती* प्रकल्प सादरीकरणप्रसंगी व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

राजघराण्याच्या राम तलाव या निसर्गरम्य परिसरात ४२ एकरात हा प्रकल्प साकारला जाणार असून या ठिकाणी १०८ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची मूर्ती स्थापना केली जाणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

नवीन राजवाडा प्रांगणात शानदार समारंभात राजेशाही थाटात हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमंत छत्रपती वृषाली राजे शिवाजी राजे भोसले (सातारा) श्रीमंत गोपाळ राजे पटवर्धन (मिरज), श्रीमंत नंदिता राजे घाटगे (कागल), श्रीमंत पद्मजाराजे पटवर्धन (मिरज) श्रीमंत नंदिता राजे घाटगे ( कागल ), हे उपस्थीत होते.

कार्यक्रमाचा शुभारंभ श्री स्वामी समर्थांचे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी सिने अभिनेते अशोक कुलकर्णी यांनी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली आणि मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर श्रीमंत मालोजीराजे भोसले, श्रीमंत छत्रपती वृषाली शिवाजी राजे भोसले,श्रीमंत गोपाळ राजे पटवर्धन (मिरज), श्रीमंत पद्मजाराजे पटवर्धन (मिरज), श्रीमंत नंदिता राजे घाटगे (कागल), हे होते.

श्रीमंत मालोजीराजे भोसले म्हणाले विख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांना श्री स्वामी समर्थांचा दृष्टांत झाला आणि तो दृष्टांत स्वामी नगरी अक्कलकोट मध्ये भव्य प्रमाणात साकारला जाणार आहे यासाठी सर्व स्वामी भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच अनुभूती प्रकल्पाचे वास्तुविशारद डॉ महेश नामपुरकर यांनी सदर प्रकल्पाचा मास्टर प्लॉन कसा घडवुन आणला व तो किती तासामध्ये घडवुन आणला याचे सवीस्तर वर्णन केले. डॉ महेश नामपुरकर यांना सदरच्या जागेचा नकाशा पाहताचा स्वामी महाराज निद्रा स्थितीमध्ये दिसुन आले.

सदर प्रकल्प हा अक्कलकोट राजघराण्याची शहराच्या मध्य ठिकाणी असलेली जागा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी निवडली आहे. सदर जागेची निवड श्री स्वामी महाराजांच्या दुष्टांतामुळे निवडली आहे. तसेच श्रीमंत मालोजीराजे भोसले यांना त्यांच्या कमी वयामध्ये एवढा मोठा प्रकल्प साकारला आहे. तसेच सदर प्रकल्पामधुन अक्कलकोट येथील नगरवासीयांना मोफत वैघकीय उपचाराची सेवा उपलब्ध करण्यात याणार आहे. सदर प्रकल्प ही अक्कलकोट गावाच्या प्रगतीची सुरूवात आहे.

यावेळी अनुभूती या पुस्तकाचे प्रकाशन आणि अक्कलकोट राजघराण्याचा इतिहास या संकेतस्थळाचे उद्घाटन देखील करण्यात आले.

या कार्यक्रमाला ॲड जयाजीराजे भोसले , जयप्रभादेवी राजे भोसले, ॲड सयाजीराजे भोसले, सत्यशिल ढमाले मधुवंती ढमाले, , जयहिंद शुगर चेअरमन गणेश माने- देशमुख, श्री दिपक पाटील, सातारा, सभापती संभाजी इंदलकर (सातारा) उद्योगपती श्रीधर कंगराळकर, आशिष कदम व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे मल्लम्मा पसारे, सोनल जाजू उन्नती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील.इतिहासकार डॉ.सतिश कदम, मुकुंद घाटगे, आकाशवाणी निवेदक मारूती बावडे,जयसिंह पाटील, जितेंद्र जाजू ,लक्ष्मण रामपूरे, डॉ विपुल शहा रोहित जिरोळे , स्वामीराज रामदे, रोहन जिरोळे , करण राजपुरोहित , सिद्धार्थ बिंदगे , अनिल जाविया.आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री दामले (मुंबई) यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button