करजगी गावचे सुपुत्र मा.महेश बोलकोटगी पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 पुणे शहर यांची उत्कृष्ट कामगिरी.्
कोंढवा येथील इस्टेट एजन्टच्या मारेकऱ्यांना १२ तासात अटक : गुन्हे शाखा युनिट-५ कडून सुपरफास्ट कामगिरी

कोढव्यातील शिवनेरी नगर भागात काल रात्री उशिरा इस्टेट एजंटचा धारधार शस्त्राने भोकसून खून झाल्याने खळबळ उडाली होती. या खुनातील मारेकऱ्यांना पुणे शहर गुन्हे शाखा युनिट – ५ कडून १२ तासातच अटक करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, रामनाथ पोकळे व गुन्हे उपायुक्त अमोल झेंडे सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे 2 सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-५ कडून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मा.महेश बोलकोटगी व त्यांच्या पथकाने सदर गुन्ह्याची उकल काही तासातच करत सुपरफास्ट कामगिरी बजावली आहे. तसेच कोंढवा पोलिसांनी वपोनि संतोष सोनवणे यांच्या नेत्तृत्वाखाली एका मारेकऱ्यास १० तासातच ताब्यात घेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.