भवानीनगर शाळेत डाॅ. अमोघसिदध शिवाजी चेंडके यांनी मराठीतून संत वाङमय विषयावर पी .एच .डी.पूर्ण केल्याबद्दल शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय धर्मसाले तर प्रमुख अतिथी म्हणून चंदय्या स्वामी लक्ष्मण केंगार आदि मान्यवर उपस्थित होते.

भवानीनगर शाळेत डाॅ. अमोघसिदध शिवाजी चेंडके यांनी मराठीतून संत वाङमय विषयावर पी .एच .डी.पूर्ण केल्याबद्दल शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

भवानीनगर, बादोले (बु) ता.अक्कलकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत डाॅ. अमोघसिदध शिवाजी चेंडके यांनी मराठीतून संत वाङमय विषयावर पी .एच .डी.पूर्ण केल्याबद्दल शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय धर्मसाले तर प्रमुख अतिथी म्हणून चंदय्या स्वामी लक्ष्मण केंगार आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तुकाराम जावीर यांनी केले.. डाॅ.चेंडके हे कुरनूर ता.अक्कलकोट येथील असून त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेऊन उच्च पदवी संपादन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केले.सध्या सोलापूर येथील बुर्ला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. याप्रसंगी डाॅ. चेंडके, दत्तात्रय धर्मसाले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक लवटे,पुष्पा तेलंगे यांनी प्रयत्न केले.
