*पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापुर शहर व जिल्हा काँग्रेसचा आढावा बैठक संपन्न*
शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी सोलापुर शहर काँग्रेसचा संघटनाविषयी अहवाल सादर केला.

*पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापुर शहर व जिल्हा काँग्रेसचा आढावा बैठक संपन्न*
———————————
पुणे, दिनांक २३ जानेवारी २०२४

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रभारी मा. श्री. रमेश चेन्नीथलाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रांताध्यक्ष मा.श्री. नानाभाऊ पटोले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणितीताई शिंदे आमदार विश्वजीत कदम, पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर- जिल्हा काँग्रेस कमिटी, कार्यालय,शिवाजीनगर येथे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली.
याबैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी सोलापुर शहर काँग्रेसचा संघटनाविषयी अहवाल सादर केला.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले म्हणाले की, संघटना बळकट केल्याशिवाय निवडणुकीत विजय मिळविता येत नाही, म्हणून पक्ष संघटना मजबूत करा. बुथ कमिट्या सक्षम करा, मा. सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्यासारख्या देशभरात नाव असणाऱ्या मोठ्या नेत्याचा पराभवाचा वचपा काढण्यासाठी, आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

यावेळी मा. सुशीलकुमार शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले की, दहा वर्षे झाली देशात काँग्रेसची सत्ता जाऊन आणि जाती धर्मावर राजकारण करणारे सत्तेवर आले. त्यामुळे सगळे बिघडून गेले आहे. सक्षम नेतृत्व असलेले रमेश चेन्नीथला महाराष्ट्राचे नूतन प्रभारी झाले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष मजबूत होईल, तसेच नानाभाऊ पटोले हे रात्रदिवस काम करत आहेत. आम्ही एक सेवक म्हणून त्यांना साथ देणार आहे.

या बैठकीस सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ चाकोते, माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मा. नगरसेवक विनोद भोसले, दत्तू बंदपट्टे, मा. नगरसेविका अनुराधा काटकर, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे, प्रदेश सचिव नरसिंग आसादे, मा. परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, प्रदेश प्रतिनिधि सुशील बंदपट्टे, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, अनुसुचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष मयूर खरात, वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, NSUI अध्यक्ष नागेश म्याकल, संजय गायकवाड, युवराज जाधव, श्रीधर काटकर, पृथ्वीराज नरोटे, शरद गुमटे, शोभा बोबे, शिल्पा चांदने, मुमताज मदर शेख, लता सोनकांबले, कालिदास काळपगार वासंती भस्मे यांच्यासह शहर व जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.