पुण्यातील रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमीच्या मुलांचा विश्वविक्रम
१५ स्केटिंग पटुंची 'गिनीज बुक ' ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड

पुण्यातील रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमीच्या मुलांचा विश्वविक्रम

१५ स्केटिंग पटुंची ‘गिनीज बुक ‘ ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड

पुणे प्रतिनिधी: अमोल धडके

बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब आयोजित ‘ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’ रेकॉर्ड कार्यक्रमांत कात्रजच्या विजय मलजी टीम रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमीच्या छोट्या १५ स्केटिंग पटुंची नोंद झाली आहे.
सलग ७५ तास रिलेमध्ये १०० मीटर अंतर १४.८४ सेकंदात पूर्ण केले.शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबतर्फे बेळगावात २८ ते ३१ मे या कालावधीत २०० मीटरच्या स्केटिंग ट्रॅकवर सलग ७५ तास रीले १०० मीटर बॅकवर्ड ऑन स्केट्स युजींग टूव्हेलची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी करण्यात आली. यामध्ये रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमीच्या
३.५ ते १४ वयोगटातील १५ खेळाडूंनी भाग घेतला होता.

पुण्यातील स्लोक दोषी,विश्वजित शेंडे ,ऋषभ चिकमळ, आविष्कार घाटे,सात्विक गरड ,पियूष कुऱ्हाडे,साई खरात, आदिराज येवले,रूद्र दराडे, सम्यक गवई, देवांश गोसावी, शांभवी गोगावले, दुर्वा वाघ, राधा नगरकर, आशनी मल्होत्रा, या स्केटिंग पटुंनी १०० मीटर अंतर १४.८४ सेकंदात पार करून हे रेकॉर्ड केले.

त्यांना बेळगावच्या ज्योती चिंडक,निखिल चिंडक यांच्या हस्ते पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आले.या खेळाडूंना रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक विजय मलजी,सहाय्यक शिल्पा कुऱ्हाडे ,सायली नगरकर, यांनी मार्गदर्शन केले.
या सर्व १५ रेकॉर्ड खेळाडूंना प्रशिक्षक विजय मलजी, सहाय्यक शिल्पा कुऱ्हाडे,सायली नगरकर यांच्या हस्ते सर्व पालकांच्या उपस्थिती मध्ये प्रमाणपत्र देण्यात आले.या सर्व खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.