गावगाथा

श्री तारामाता प्राथमिक शाळेत,अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा.

वाढदिवस विशेष

श्री तारामाता प्राथमिक शाळेत,अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा.

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट दि. २४ जानेवारी रोजी श्री तारामाता प्राथमिक शाळा अक्कलकोट, येथे अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्ता राजे भोसले,यांचा वाढदिवस संपन्न झाला. सदर कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कदम यांच्या हस्ते अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर केक कापून राजेंना औक्षण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. राजे साहेबांनी वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले व त्यांनी आपल्या अनुभूती प्रकल्पाबद्दल माहिती सांगितली.
राजेंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मनमोकळ्या गप्पागोष्टी केल्या.राजे साहेबांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना एक वेगळाच आनंद मिळाला.सदर कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त सुधाकर गोंडाळ, अमर शिंदे,स्वामीनाथ हरवाळकर सर,बिराजदार सर,मुकुंद घाडगे सर,शिशु विभागाच्या मुख्याध्यापिका,संयोगिता साळुंखे, सहशिक्षिका रागिणी जाधव ,पुष्पा हरवाळकर,शितल गोडसे,अंजली जाधव, प्रशांत संगोळगी सर, आरिफ शेख सर,अमोल पाटील,शितल फुटाणे,लता शिर्के ,सुवर्णा सुरवसे आदी जण उपस्थित होते ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल कदम यांनी केले व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button