गावगाथा

विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भक्तांनासाठी सुरू असलेल्या स्वामी कार्या बरोबरच निराधार, दिव्यांग यांच्या करीता सुरू केलेली समर्थ महाप्रसाद सेवा कौतुकास्पद उपसंचालक आनंद नरखेडकर

उपाध्यक्ष अभय खोबरे व सचिव शामराव मोरे यांच्या उपस्थितीत भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भक्तांनासाठी सुरू असलेल्या स्वामी कार्या बरोबरच निराधार, दिव्यांग यांच्या करीता सुरू केलेली समर्थ महाप्रसाद सेवा कौतुकास्पद असल्याचे मनोगत सहा संचालक व सरकारी अभियोक्ता सोलापूर तथा पश्चिम पुणेचे उपसंचालक आनंद नरखेडकर यांनी व्यक्त केले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे व सचिव शामराव मोरे यांच्या उपस्थितीत भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत अक्कलकोटचे सरकारी वकील अँड.जी.बी.सरवदे, व अँड.इस्माईल बेसकर हे उपस्थित हेते.

HTML img Tag Simply Easy Learning    

न्यासाचे एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, सौरभ मोरे, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, शिवराज स्वामी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button