मराठा मंदिर मुंबई संचलित श्री शहाजी हायस्कूलच्या सन १९८३-८४ बॅचच्या माजी विद्यार्थ्याचा पुन्हा एकदा ४० वर्षांनंतर भरली शाळा …
स्नेहमेळाव्यात विद्यार्थ्यांनी ४० वर्षापूर्वीच्या काळातील अनेक किस्से सांगितले. तेव्हा वातावरण भारावून गेले.

मराठा मंदिर मुंबई संचलित श्री शहाजी हायस्कूलच्या सन १९८३-८४ बॅचच्या माजी विद्यार्थ्याचा पुन्हा एकदा ४० वर्षांनंतर भरली शाळा …

येथील मराठा मंदिर मुंबई संचलित श्री शहाजी हायस्कूलच्या सन १९८३-८४ बॅचच्या माजी विद्यार्थ्याचा हुरडा पार्टी व स्नेहमेळावा बळोरगी फार्म हाऊसवर पुन्हा एकदा ४० वर्षांनंतर भरवण्यात आला.

यावेळी फार्म हाऊसवर उभारण्यात आलेल्या शामियाना मंडपासमोर विद्यार्थिनींनी सुंदर रांगोळी रेखाटली. सर्वांचे स्वागत ऊसाचे रसाच्या आस्वादाने करण्यात आले. शाळेतील घंटा व परंपरागत प्रार्थना गीत सादर करून वर्गात गुरुजनांचे अनोखे स्वागत करण्यात आले.

मैत्री हा असा धागा ज्यात डॉक्टर , इंजिनिअर , नोकरदार, व्यावसायिक , मोठे उद्योजक, प्रतीष्टीत शेतकरी , मोलमजुरी करणारे कामगार व सर्व कलाकार अश्या सर्व मोती गुंफले. शेवट गाण्याच्या भेंडीने झाली. आनंदी राहण्याचा एकच उपाय म्हणजे मैत्री असल्याचे सांगितले.

४१ वर्षांनी पुन्हा आम्हाला बी. ए. कुरनूरकर, एम.बी. पाटील, बी. जी. शिंदे, आत्माराम घाटगे, आरती काळे, ताराबाई हांडे या गुरुवर्यांचे उपदेश आशीर्वादरुपी मिळाले. यात आम्ही भाग्यवान ठरलो असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
यावेळी शिक्षकांनी आपल्या मनोगतात म्हणाले, या बॅचने विविध क्षेत्रांमध्ये शाळेचे नाव कमावले म्हणून तुमच्यामुळे आमचा सन्मान वाढला. असे विद्यार्थी घडवू शकलो याचा अभिमान आहे.

या स्नेहमेळाव्यात विद्यार्थ्यांनी ४० वर्षापूर्वीच्या काळातील अनेक किस्से सांगितले. तेव्हा वातावरण भारावून गेले.
माजी नगराध्यक्ष अशपाक बळोरगी यांनी या मेळाव्यास भेट देऊन शुभेच्छा दिले.
कार्यक्रमानंतर सर्वानी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
एजाज बळोरगी, मल्लिनाथ मसुती , श्रीशैल उंबराणीकर , सुरेश वेदपाठक , सुधाकर महिंद्रकर, निवास इंगळे, अनिता अंबुरे, मीना सूर्यवंशी, डॉ.आसावरी पेडगावकर, विजया भोसले, चारुलता पोतदार, मनोज लच्याणकर, प्रदीप हिंडोळे, मिलिंद पागे , संगीता गुरव, पुष्पा देडिया, अरुण लोखंडे , श्रीदेवी घंटे, सत्तार बागवान, अशोक नाईक, स्वामीराव पाटील, पी पी बिराजदार, गणपत कोले, सुरेश पुजारी, शिवशरण कलशेट्टी, राजू हर्डीकर , ऐश्वर्या शिंदे, शिवशरण शटगर, रणजित पाटील , मौलाली मुकादम, प्रभूलिंग कलबुर्गी परिश्रम घेतले.