शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणीमध्ये अक्कलकोट मधील एस बी क्रिकेट अकॅडमीचे खेळाडू प्रतिभा माशाळे हिची महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड
प्रतिभा माशाळे हिचा महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल सी. बी. खेडगी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने संचालिका पवित्रा खेडगी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

अकलूज येथे नुकताच झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणीमध्ये अक्कलकोट मधील एस बी क्रिकेट अकॅडमीचे खेळाडू प्रतिभा माशाळे हिची महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे.

माशाळे हिने संघामध्ये फलंदाजी व गोलंदाजी अशा दुहेरी भूमिका निभवायचे कौशल्य प्राप्त केले आहे. तिचा सराव नियमित कौशल्य जनक सुरू आहे.

अष्टपैलू महिला खेळाडू
प्रतिभा माशाळे हिचा महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल सी. बी. खेडगी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने संचालिका पवित्रा खेडगी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

तिला अकॅडमी चे संस्थापक प्रशिक्षक सागर बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिभा माशाळे हिच्या निवडीबद्दल
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, सेक्रेटरी सुभाष धरणे, व्हाइस चेअरमन अशोक हारकुड, संचालक मंडळ, माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे सह सेक्रेटरी चंद्रकांत रेम्बर्सू , चेअरमन रणजीतसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष दिलीप माने यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
——+++++++++++
फोटो ओळ –
अक्कलकोट – येथील खेळाडू प्रतिभा माशाळे हिचा महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल संचालिका पवित्रा खेडगी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
