गावगाथा

राज्यस्तरीय लिंगायत वधु- वर व पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

सर्व मान्यवरांच्या हस्ते वधू -वर व सूचक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

राज्यस्तरीय लिंगायत वधु- वर व पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

सोलापूर (प्रतिनिधी):- महात्मा बसवेश्वर वधू -वर व सुचक केंद्र कुपवाड सांगली व लिगायत महामंच, भारत सहकार्याने दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात राज्यस्तरीय लिंगायत वधु- वर व पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सुमारे चारशे वधू -वर व पालक यांनी याचा लाभ घेतला.
प्रारंभी शिवयोगी सिद्धरामेश्वर व महात्मा बसवेश्वर यांचे प्रतिमेची पूजा शिवयोगी मठाचे प. पू.बसवलिंग महास्वामीजी व बसव केंद्राचे प्रमूख सिंधुताई काडादी यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय लिंगायत महामंच चे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे माळी समाज संघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे, आनंद मुस्तारे,गणेश चिंचोळे, जागतिक लिंगायत महासंघाचे मल्लिकार्जून मुलगे,जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव सर, सचिन तुगावे, उद्योजक रेवणसिध्द बिजरगी, जागतिक लिंगायत महासभा महिला जिल्हाध्यक्ष राजश्री थळंगे, महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सचिन शिवशक्ती,नामदेव अण्णा फुलारी,तुकाराम माळी, नागेंद्र कोगनुरे, दक्षिण तालुका अध्यक्ष डॉ. नंदर्गी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित होते. या राज्यस्तरीय मेळावास मार्गदर्शन करताना परमपूज्य बसवलिंग महास्वामीजी म्हणाले लिंगायत समाजातील सर्व पोट जात विसरून महात्मा बसवणांच्या समतावादी विचारसरणी आचरणात आणून आपले रोटी बेटी करावे. यावेळी मान्यवर सिंधुताई काडादी, शिवानंद गोगाव, विजयकुमार हत्तुरे आदींनी मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते वधू -वर व सूचक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

लिंगायत वधु -वर व पालक परिचय मेळाव्यात लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील लिंगायत वाणी, माळी, कुंभार,तेली, बनजगार गवळी ,जंगम,शिलवंत,दिक्षावंत,कोष्टी, पंचम,आदीसह सर्व पोटजातीतील वधु- वर व पालक सहभाग नोंदवला.
मेळावा यशस्वी होण्यासाठी स्वागताध्यक्ष आप्पासाहेब शेगावे ,कार्यवाहक प्रियांका शेगावे, सुनिल दलाल , निलेश पाटील, श्रीशैल पॅडशिंगे, चंद्रकांत पाटील यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button