*संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या नावाने विश्व विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मा.मुख्यमंत्री यांची संमती…*
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने निवेदन

*संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या नावाने विश्व विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मा.मुख्यमंत्री यांची संमती…*

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांना समाजाच्या विविध मागण्यासाठी *राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. बबनरावजी घोलप (नाना)* यांनी आज निवेदन दिले व सह्याद्री अतिथीगृहा हॉलमध्ये विविध विषयावर समाजाच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली असता माननीय मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ सर्वच मागण्या मान्य केल्या.तर काही मागण्यांसाठी त्वरित कारवाई करण्यासाठी अधिकारी वर्गाला निर्देश दिले. त्याबद्दल *मा.मंत्री बबनरावजी घोलप संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले..* या बैठकीसाठी खालील पदाधिकारी व समाज कल्याणचे सचिव, लिडकॉमआयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त उपस्थित होते. श्री.भानुदास विसावे, सरोज बिसुरे, श्री.दत्तात्रय गोतीसे, श्री. रविंद्र रजुस्कर ,श्री.ज्ञनेश्वर कांबळे, श्री.माधवराव गायकवाड,श्री. शांताराम कारंडे, श्री.अनिल कानडे,श्री.अशोकराव माने,श्री.उमाकांत डोईफोडे,
डॉ.गोपाल बाचिरे, श्री. दिलीप चव्हाण उपस्थित होते.
