भाविकांच्या सोईसह वटवृक्ष मंदीराचे उपक्रम उल्लेखनीय – पो.नि. राजेंद्र टाकणे
पो.नि.राजेंद्र टाकणे यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

भाविकांच्या सोईसह वटवृक्ष मंदीराचे उपक्रम उल्लेखनीय – पो.नि. राजेंद्र टाकणे

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१४/२/२४) –
(श्रीशैल गवंडी) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी दर्शनासाठी मंदीरात येणाऱ्या भाविकांकरीता असलेल्या सोई सुविधा या सर्वोत्तम दर्जाच्या असून या सह मंदिर समितीचे सर्व धार्मिक सामाजिक उपक्रम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन
उत्तर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी केले.
ते नुकतेच अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर रुजू झाल्यानंतर सर्वप्रथम येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी मंदीर समितीच्या विवीध कार्याचा आढावा घेतल्यानंतर बोलताना पो.नि.राजेंद्र टाकणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मंदीर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, संजय पवार, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, विपूल जाधव, प्रसाद सोनार इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – पो.नि.राजेंद्र टाकणे यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
