*नागणसुर कन्नड मुली शाळेत संत सेवालाल जयंती उत्साहात*
तालुक्यातील नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुली व मुले शाळेत संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन देण्यात आले.

*नागणसुर कन्नड मुली शाळेत संत सेवालाल जयंती उत्साहात*

अक्कलकोट:-
तालुक्यातील नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुली व मुले शाळेत श्री संत सेवालाल जयंती निमित्त आज श्री संत सेवालाल प्रतिमा पुजन करून मोठ्या उत्साहात आचरण करण्यात आले

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी केंद्रीय मुख्याध्यापक विद्याधर गुरव होते.प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर गंगोंडा ,नागणसुर मराठी शाळेचे नूतन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वनाथ प्रचंडे,उपाध्यक्ष बसवराज मोरे,कन्नड मुले शाळेचे नूतन अध्यक्ष बसनिंगप्पा स्थावरमठ,उपाध्यक्ष गजानंद रेवी,कन्नड मुली शाळेचे अध्यक्ष गंगाधर भोसगी,उपाध्यक्ष बसवराज तेग्गीनकेरी , शिवानंद धरगोंडा उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमा पूजन करून पुष्पवृष्टी करून अभिवादन देण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड व मराठी शाळेचे नूतन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या सत्कार कन्नड मुली शाळेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या हस्ते करूंन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरणप्पा फुलारी यांनी केले तर आभार शिवशरण म्हेत्रे सर यांनी मानले.
शाळेचे मुख्याध्यापक मल्लप्पा कवठे,कल्लय्या गणाचारी,शांताबाई तोळणूरे,राजशेखर खानापुरे, शरणप्पा फुलारी,बसय्या स्वामी, विजयालक्ष्मी एंटमन, चननम्मा बिराजदार,शिवशरण म्हेत्रे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
फोटो ओळ :- तालुक्यातील नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुली व मुले शाळेत संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन देण्यात आले. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर गंगोंडा ,नागणसुर मराठी शाळेचे नूतन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वनाथ प्रचंडे,उपाध्यक्ष बसवराज मोरे,कन्नड मुले शाळेचे नूतन अध्यक्ष बसनिंगप्पा स्थावरमठ,उपाध्यक्ष गजानंद रेवी,कन्नड मुली शाळेचे अध्यक्ष गंगाधर भोसगी,उपाध्यक्ष बसवराज तेग्गीनकेरी , शिवानंद धरगोंडा मुख्याध्यापक मल्लप्पा कवठे,सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
