गावगाथा

लोकांची मने स्वच्छ करण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांची आवश्यकता…… प्राचार्य अशोक सपाटे

नाईक नगर, ता. उमरगा येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या समारोप प्रसंगी बोलताना अशोक सपाटे, व्यंकटराव जाधव, रितेश जाधव, चंद्रकांत बिराजदार व अन्य.

लोकांची मने स्वच्छ करण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांची आवश्यकता…… प्राचार्य अशोक सपाटे

मुरुम, ता. उमरगा, ता. १५ (प्रतिनिधी) : देशाला वैचारिक दृष्ट्या समृद्ध करण्यासाठी महापुरुषांचे विचार तरुणांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. तरुणांच्या मस्तकामध्ये चांगले विचार येण्यासाठी तरुणांनी चांगल्या व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली पाहिजेत. गावातील लोकांची मने स्वच्छ करण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी केले. नाईक नगर, ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ‘ युवकांचा ध्यास ग्रामविकास व बालविवाह जनजागृती ‘ या शीर्षकाखाली वार्षिक विशेष शिबिर समोरापप्रसंगी गुरुवारी (ता. १५) रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी होते. या वेळी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, नाईक नगर (सुं) चे सरपंच रितेश जाधव, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे उपप्राचार्य योगेश पाटील, प्रा. प्रियंका काजळे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका प्रतिनिधी कु. सोनाली बनसोडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना अशोक सपाटे म्हणाले की, आज युवकांसमोर विविध आव्हाने आहेत. यामध्ये पाणी टंचाई, आरोग्यविषयक प्रश्न, वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, बदलती मानसिकता, गुन्हेगारीकरण, गावातील वाद-विवाद अशा विविध समस्यांना गावातील नागरिक तोंड देत आहेत. आई-वडिलांचे चांगले संस्कार घेऊनच तरुणांनी भविष्यात स्वतःची प्रगती साधावी. यावेळी डॉ. चंद्रकांत बिराजदार, कुमारी सोनाली बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे, डॉ. शिला स्वामी, डॉ. प्रकाश कुलकर्णी, डॉ. विलास खडके, डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. रवींद्र आळंगे, डॉ. भिलसिंग जाधव, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. महेश मोटे, डॉ. संध्या डांगे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. अविनाश मुळे, डॉ. सुजित मठकरी, प्रा. गोपाळ कुलकर्णी, प्रा. अजिंक्य राठोड, श्रावण कोकणे आदिंनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत प्रा. डॉ. शिला स्वामी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. अशोक बावगे यांनी मानले. बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी, ग्रामस्थ उपस्थित होते.                   

फोटो ओळ : नाईक नगर, ता. उमरगा येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या समारोप प्रसंगी बोलताना अशोक सपाटे, व्यंकटराव जाधव, रितेश जाधव, चंद्रकांत बिराजदार व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button