जगदगुरु संत सेवालाल महाराजांचे विचार जगासाठी कल्याणकारी – महेश इंगळे
कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात श्री.संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240217-WA0043-780x470.jpg)
जगदगुरु संत सेवालाल महाराजांचे
विचार जगासाठी कल्याणकारी – महेश इंगळे
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात श्री.संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१७/२/२४)
जगदगुरु संत सेवालाल महाराजांचे
विचार हे जगासाठी कल्याणकारी आहेत. जगदगुरुंच्या आशिर्वादाने भारत देश सुजलाम सुफलाम बनला आहे, त्यामुळे सर्वांनी जगदगुरु श्री.संत सेवालाल महाराजांचे विचार आत्मसात केले पाहिजे असे विचार श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे तथा कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे चेअरमन महेश इंगळे यांनी व्यक्त केले. नुकतेच जगद्गुरु श्री संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त श्री संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन देवस्थानचे व महाविद्यालयाचे चेअरमन महेश इंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महेश इंगळे बोलत होते. प्रसंगी व्यासपीठावर देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त तथा करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती संपतराव शिंदे, महेश गोगी, प्राचार्य एन.बी.जेऊरे सर, उपप्राचार्य विजयकुमार पवार सर, शैक्षणिक समन्वयक भावठाणकर सर, विभागप्रमुख माने सर, विभागप्रमुख जनगोंडा सर, विभागप्रमुख खिलारी सर, सोनवणे सर सर्व स्टाफ व विद्यार्थी यावेळी हजर होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
फोटो ओळ – श्री संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्रसंगीचे छायाचित्र
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)