शावळ येथील ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंगेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
9 ते 19 फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
शावळ येथील ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंगेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथील ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंगेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त 9 ते 19 फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.नऊ रोजी सकाळी ठीक नऊ वाजता नागणसुरचे डॉ अभिनव बसवलिंग महास्वामीजींच्या हस्ते धर्म ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. दररोज रात्री आठ वाजता श्री ब्रह्मलिंग यांच्या जीवन चरित्रावर मायप्पा पुजारी शिंदगी यांच्या रसाळवाणीने पुराण होणार आहे. दरम्यान धनगरी ओव्यांची काव्यमैफल होणार असून भारुड भजनांची जुगलबंदी रंगणार आहे. 17 रोजी 11 पालख्यांचीयां भेट दिवसभर धनगरी ओव्या कार्यक्रम अठरा रोजी होमहवन देवास फुल चढविणे पालखींची मिरवणूक नंतर श्री विठ्ठललिंग महाराज यांच्या हस्ते लक्षदीपोत्सवाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.19 रोजी सकाळी 10.25 वाचता शिवाचार्यरत्न श्री श ब्र डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी श्री विठ्ठलनंद महाराज श्री डॉ अभिनव बसवलींग महास्वामी सोमलिंग महाराज ज्ञानसिंधू महाराज हावळप्पा महाराज धरेप्पा महाराज म्हाळप्पा पुजारी महाराज अनेक धर्मगुरूंच्या दिव्य सानिध्यात काळसरोहण त्यानंतर धर्मसभा महाप्रसाद रात्री नयनरम्य शोभेचे दारूकाम होणार आहे.