गावगाथा

*शिवपरिवाराचे स्मरण हा दैनंदिन जीवनात पारायणाचा भाग बनला पाहिजे असे प्रतिपादन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे

शिवजयंती उत्सव विशेष

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*शिवपरिवाराचे स्मरण हा दैनंदिन जीवनात पारायणाचा भाग बनला पाहिजे असे प्रतिपादन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले.*

मैंदर्गी रोड येथील गुरुप्रसाद टाऊनशीप-स्वामीविश्व नगर-गौडगांव रोड-अक्कलकोट शहर यांना जोडणार्या चौकास राष्ट्रमाता जिजाऊ चौक नामफलक अनावरण प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,देवी समान असणाऱ्या जिजाऊ माँ साहेब अठरा पगड जातींना सोबत घेऊन जाणार्या आदर्शवत राज्यकर्त्या होत्या.

जाधव गड परिसरात शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून हिरकणी महिला बहु. संस्था, महेश इंगळे मित्र परिवार यांच्या सौजन्याने. जिजाऊ चौक नामफलक अनावरण,स्व.उमेश इंगळे वाचनालय, स्व.बाळासाहेब इंगळे आसन व्यवस्था, शिव-शंभू सांस्कृतिक मंडळ,जिजाऊ सखी मंच वार्ताफलक,ध्वजस्तंभ उद्घाटन अलकाताई भोसले,महेश इंगळे,अर्पिताराजे भोसले,प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाबासाहेब पाटील, श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, यांनी आपल्या मनोगतात शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. सदर सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मा.नगराध्यक्षा अनिता खोबरे,नगरसेविका सोनाली शिंदे,समर्थ नगर ग्रामपंचायत सदस्य रोहिदास राठोड,स्वामी समर्थ आश्रमाचे राजेंद्र महाराज सुरवसे,शिवयोग प्रतिष्ठान चे योगेश पवार, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष शंकर पाटील, गुरुमाता मलम्मा पसारे,लिटल स्टार स्कूलच्या राजश्री करकी,राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष सागर सोमवंशी, मराठा सेवा संघ मा. अध्यक्ष राम जाधव,आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सर्व अतिथींचे स्वागत बापुजी निंबाळकर यांनी केले.
प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन होऊन सदर कार्यक्रमास सुरुवात झाली.
कार्यक्रमाची प्रस्तावना अतुल जाधव यांनी मांडली.

उद्घाटक मान्यवरांचा सन्मान मा.नगरसेविका संयुक्ता जाधव,अतुल जाधव,सपना होदलूरे,भिमराव साठे,यांच्या हस्ते करण्यात आला.तर प्रमुख उपस्थित मान्यवरांचा सन्मान ज्योती सिंदगीकर,आकांक्षा कांबळे,इंजि.ओंकार आलोणे, सुरेश कदम,पल्लवी घाटगे,सुनिता गायकवाड, रेखा भाकरे,महेश होदलूरे, राजेंद्र बाके,वैभव पवार, बालाजी जाधव,पुजा देसाई, राजू शिंगे यांनी केला.

यावेळी शिव-शंभू सांस्कृतिक मंडळाचे अनुक्रमे महादेव होदलूरे, सुरेश देसाई, रोहन शिर्के,जयप्रकाश भाकरे, सुभाष पुजारी, प्रविण काशीद,विशाल पवार, संतोष शिंदे, प्रताप भोसले,तात्या जामदार, मनोज जाधव,माधव मोरे,ज्ञानेश्वर भोसले, फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे सुधाकर गोंडाळ,अमर शिंदे, आदी व जिजाऊ सखी मंचाच्या अनुक्रमे प्रतिभा जाधव,रेणुका जाधव,अश्विनी सिंदगीकर, राजश्री पवार, वैशाली काशीद, रेखा चव्हाण, प्रभावती बिराजदार, सपना चव्हाण, ज्योती पडवळकर,म्रुणाली जाधव,आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशिष कांबळे-वर्षा चव्हाण यांनी तर आभार स्वामिराव सुरवसे यांनी केले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश देसाई, समर्थ बिरादार, विजय वाले,विराज घाटगे,अस्मिता घाटगे,भाग्यवंती देसाई, स्वाती भोसले, स्वराज्य जाधव,प्रमोद भोसले,वैभवी जाधव यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button