गावगाथा

*सोलापूर जिल्हा अनुभव मंटपाच्या प्रमुख पदी पूज्य माता महानंदाताई यांची निवड.*

निवड नियुक्ती

*सोलापूर जिल्हा अनुभव मंटपाच्या प्रमुख पदी पूज्य माता महानंदाताई यांची निवड.*

………
अक्कलकोट दि,२०_विश्वगुरू महात्मा बसवेश्वर साहित्य परिषदेची उपवाहिनी सोलापूर जिल्हा अनुभव मंटपाच्या प्रमुखपदी बसवपीठ, मुगळीच्या पूज्य माता महानंदाताई हिरेमठ यांची एकमताने निवड करण्यात आली.अध्यक्षस्थानी लिंगायत विरक्त मठाचे पूज्य बसवलिंग महास्वामीजी हे होते.
अक्कलकोट येथील विरक्त मठात आयोजित महात्मा बसवेश्वर साहित्य परिषदेच्या बैठकीत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर यांनी ही निवड जाहीर केली.यावेळी अनुभव मंटपाचे कार्य स्पष्ट करताना त्यांनी सांगितले,विश्वातील क्रांतिकारी असा बसव धर्माचा इतिहास आहे अठरा पगड जातींना आपल्या कवेत घेऊन वंचित घटकातील दिन,दलित आणि सर्व माता-भगिनींना एका व्यासपीठावर आणून त्यांना बसवण्णानीं बोलवते केले.याच अनुभव मंटपात लोकशाहीची स्थापना झाली.लिंगवंत धर्माच्या तेजस्वी इतिहासाच्या प्रसार व प्रचार करण्यासाठी सोलापूर जिल्हा अनुभव मंटपाची स्थापना केल्याचे हरवाळकर यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील लिंगायत बहुल तालुक्यात प्रथम अनुभव मंटपाची सुरुवात करण्यात येणार आहे.त्यानंतर हा उपक्रम प्रभावीपणे सीमावरती जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याचे पूज्य महानंदाताई हिरेमठ यांनी सांगितले.यावेळी मल्लम्मा पसारे,शिवानंद गोगाव, सुधीर माळशेट्टी,नागेश कोनापुरे, आनंद खजुरगीकर,शरणू अल्लोळी बसवराज बाके,मल्लिनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

……..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button