
जागतिक लिंगायत महासभा एक दिवसीय अभ्यास शिबिर

सोलापूर
जागतिक लिंगायत महासभा सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने एक दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष शिवानंद गोगाव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवार, 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता येथील विमानतळासमोरील सिध्दव्वाबाई हत्तुरे संस्कृती सभा भवन येथे षटस्थल ध्वजारोहण करून कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. अक्कलकोट तालुक्यातील मुगली बसवमंटपच्या महानंदाताईंच्या नेतृत्वाखाली, शिवयोगाश्रम सोलापूर चे बसवलिंग स्वामीजी धुत्तरगवा-उस्तुरी मठाचे कोरणेश्वर स्वामीजी , किरीटेश्वर मठाचे स्वामीनाथ स्वामीजी च्या सानिध्यात, सोलापूर येथील एमके फाऊंडेशनचे संस्थापक व सागर सिमेंटचे व्यवस्थापक महादेवाजी कोगनुरे, हे उद्घाटन करणार आहेत. अध्यक्षस्थानी महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजशेखर तंबाके असतील.
लिंगायतधर्माचा इतिहास, सिद्धांत आणि संघटना या विषयावर अक्कलकोट खेडगी महाविद्यालयाच्या कन्नड विभागाचे प्रमुख डॉ.गुरुलिंगप्पा धबाले, बसवकेंद्रच्या सिंधुताई काडादी, पत्रकार चन्नवीरा भद्रेश्वरमठ हे विषय मांडतील.
राष्ट्रीय लिंगायत महामंच भारत चे संस्थापक विजयकुमार हत्तुरे , मंगळवेढा संत दामाजी साखर कारखान्याचे चेरमन शिवानंद पाटील, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, प्लास्टिक सर्जन डॉ.शरणबसव हिरेमठ, महासभा चे राज्य सचिव बसवराज कणजे, कलबुर्गी शाखे चे अध्यक्ष प्रभुलिंग महारागावकर, शिक्षक संघांचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी नवनियुक्त तालुका पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्याबरोबरच सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. वागदरी कन्नड शाळेतील मुलींचे वचन नृत्य, महिळा शाखेचे सदस्यांचे वचन गायनाचा कार्यक्रम.
अभ्यास शिबिरात लिंगायतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी विनंती महासभा चे उपाध्यक्ष शिवराज कोटगी, कोषध्यक्ष नगेंद्र कोगनुरे,सचिव धोंडप्पा तोरणगी यांनी केली. पत्रकार परिषदेला महासभेचे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन मुलगे, सोलापूर शहर शाखे चे अध्यक्ष अशोक शेगावकर, शिवराज कोटगी, जिल्हा महिला शाखे चे अध्यक्ष राजश्री थलंगे, विजय भावे, बसवराज चाकाई, शिवशरण लोकापुरे,राजेंद्र खसगी आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
