*चपळगाव येथे पारंपारिक पद्धतीने शिवाजी महाराजांच्या पालखीचे घरोघरी स्वागत करून माता भगिनींनी केले शिवरायांच्या मूर्तीचे औक्षण*
*श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे स्वागत घरोघरी श्रीच्या मूर्तीचे पूजन करत माता भगिनी गावकरी आनंद व्यक्त करत होते.*

*चपळगाव येथे पारंपारिक पद्धतीने शिवाजी महाराजांच्या पालखीचे घरोघरी स्वागत करून माता भगिनींनी केले शिवरायांच्या मूर्तीचे औक्षण*


छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान चपळगाव ता.अक्कलकोट, जि सोलापूर यांच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.प्रथमतः गावातील प्रमुख मार्गांवरून दिमाखदार पालखीमध्ये भव्य शिवरायांच्या मूर्तीची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत गावातील नागरिक, ग्रामस्थ ,समाजबांधव व शिवभक्तांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मूर्तीचे पूजन भारतीय सैन्यदलातुन कॅप्टन या पदावरून निवृत्त झालेलें श्री व सौ. मडोळप्पा बडुरे व मंडळाचे सदस्य श्री व सौ. स्वराज इंगुले यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच प्रतिष्ठानचे सचिव श्री सुरेश सुरवसे यांच्याकडून ११०किलो महाप्रसाद मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आला,


तसेच उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गावच्या सरपंच सौ.वर्षाताई भंडारकवठे,मा.सरपंच उमेश पाटील,अप्पासाहेब पाटील,अंबना काका भंगे,गुरुवर्य के. बी. पाटील सर,प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज इंगुले, पंडित पाटील,सिद्धाराम भंडारकवठे, अभिजीत पाटील,महेश पाटील ,गणेश कोळी,सुरेश सुरवसे,गंगाधर कांबळे, गुरुजी,संजय बाणेगाव, महेबूब तांबोळी,मचिंद्र सुरवसे, अविनाश कदम , प्रकाश सुरवसे पिंटू भोसले, शाम इंगुले, ज्ञानेश्वर कदम सर,संतोष मोरे,मेघराज इंगुले, दयानंद फताटे,सुरेश इंगुले,मल्लिनाथ पाटील सर,बाळासाहेब बनसोडे अंबणा डोळे, अक्षय बुगडे, शिवराज सराटे,संजय भोसले,राजू कोळी, तमा सोनार,गंगाराम भोसले, श्रीमंत इंगुले व प्रतिष्ठानचे सदस्य व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

*श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे स्वागत घरोघरी श्रीच्या मूर्तीचे पूजन करत माता भगिनी गावकरी आनंद व्यक्त करत होते.*