शिक्षकांनी दिलेल्या योगदानामुळेच शैक्षणिक संस्थांना मोठेपण ..आमदार सचिन कल्याणशेट्टी
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभ

शिक्षकांनी दिलेल्या योगदानामुळेच शैक्षणिक संस्थांना मोठेपण ..आमदार सचिन कल्याणशेट्टी

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभ

अक्कलकोट

शिक्षक वाचन, चिंतन, मनन करतात त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व समाजमान्य होते. अखंड ज्ञानसाधना केल्यामुळे व्यासंग वाढतो. ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. आदर्श विद्यार्थी घडविण्याचे कार्य ते करतात. त्यांच्या कार्यामुळेच शैक्षणिक संस्थांना मोठेपण प्राप्त होते, असे प्रतिपादन आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेतील सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक विद्यालय व अनंत चैतन्य प्रशाला हन्नूर येथील सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, संचालक मुकुंद पत्की,सचिव भिमराव साठे, संचालक मल्लिकार्जुन मसुती,जेष्ठ सदस्य महावीर शहा, विज्ञान विभाग प्रमुख पूनम कोकळगी,कल्याणशेट्टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्रसिंह लोखंडे, हन्नूर प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक साखरे, गुरूपादप्पा आळगी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, शिक्षक त्यांच्या कार्यामुळे पूजनीय असतात. विद्यार्थ्यांना भविष्यकाळाची दिशा ते दाखवतात. संस्था फक्त त्यांना कार्य करण्याची संधी देत असते.

प्रारंभी बापूजी निंबाळकर, शिवानंद पुजारी गुरुनाथ गवंडी, विलास बिराजदार, विश्वनाथ चव्हाण, निंगप्पा बिराजदार, खंडेराव घाटगे व अ. करीम मुल्ला (लिपीक) या सर्व सेवानिवृत्त मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी केले. सूत्रसंचलन कल्पना स्वामी यांनी केले तर आभार मुख्याध्यापक अशोक साखरे यांनी मानले.
चौकटीतील मजकूर
शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतर पर्यटन करावे ..
शिक्षकांनी गृहस्थाश्रमात व्यतित न होता पर्यटन करावे, योग साधना करावी, मन मुराद सहचरणीसह पर्यटनाचा आनंद घ्यावा असे संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
जीवन कृतार्थ झाल्याची अनुभूती मिळाली.
शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना अध्यापन केल्यामुळे विद्यार्थी उच्च पदावर कार्य करत आहेत. ही संधी पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्यामुळे मिळाली. संस्थेमुळे कुटुंबाचा विकास झाला. त्यामुळे जीवन कृतार्थ झाल्याची अनुभूती मिळाली असे भावनात्मक उद्गार सेवानिवृत्त शिक्षकांनी यावेळी व्यक्त केले.
फोटो ओळ
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी व मान्यवर