गावगाथा

देशाचे, राज्याचे व तालुक्याचे उज्वल भविष्य घडवायचे असेल तर केंद्रात मोदी राज्यात देवेंद्र फडणवीस शिवाय पर्याय नाही, किणी वाडीच्या चौफेर विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आमदार सचिन कल्याणशेट्टी

भूमिपूजन

*देशाचे, राज्याचे व तालुक्याचे उज्वल भविष्य घडवायचे असेल तर केंद्रात मोदी राज्यात देवेंद्र फडणवीस शिवाय पर्याय नाही, किणीवाडीच्या चौफेर विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आमदार सचिन कल्याणशेट्टी

🔶अक्कलकोट :* ( प्रतिनिधी)
*देशाचे, राज्याचे व तालुक्याचे उज्वल भविष्य घडवायचे असेल तर केंद्रात मोदी राज्यात देवेंद्र फडणवीस शिवाय पर्याय नाही म्हणून आगामी दोन्ही निवडणुकीत भाजपाला साथ द्या, समाजकारण व राजकारण करीत असताना गेल्या 40 वर्षापासून कल्याणशेट्टी परिवाराच्या पाठीशी आपण सगळे किणी वाडीकर खंबीरपणे साथ देत आला आहात आगामी काळातही आशीर्वादाची गरज आहे किणीवाडीच्या चौफेर विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे आमदार कल्याणशेट्टी बोलत होते.*

ते किणीवाडी ते पालापूर, किणीवाडी ते शिंदगाव, बादोला ते कुरनूर ह्या गावच्या रस्ता सुधार करण्याकामी 2 कोटी 88 लाख रुपयेचे साडेसात किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन प्रसंगी किणीवाडी येथे आयोजित कार्यक्रमात आमदार कल्याणशेट्टी बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, राजकुमार बंदीछोडे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा उपअभियंता अमोल खमितकर, अजित तेली, गायत्री मुळे, कीणीवाडीचे उपसरपंच शिवयोगी तांबोळकर, सिद्धाराम होनशेट्टी, सिद्धाराम नागणसूरे, महादेव नरुणे, शिवराय बिराजदार, तानाजी जाधव, गुरशांत नागणसूरे, भागेश सुतार, लिंगराज होनशेट्टी, श्रीशैल नरुणे, विठ्ठल देवणगाव, महादेव जाधव, सुधाकर शिंदे, बाबन जमादार आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले मोदी सरकार गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांचा रोजगारांचा शोषित पिढीत वंचितांचा सारासार विचार करून शेतकरी सन्मान योजना, ऑपरेशन ग्रीन अग्निपथ पंतप्रधान कुसुम योजना, आयुष्यमान सहकार योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, अटल पेन्शन योजना, मातृत्व वंदना योजना, अंत्योदय अन्न योजना, मोफत पिक विमा योजना, उज्वल योजना, स्टार्ट अप इंडिया आदी सह बहुसंख्य योजना म्हणून देशातील रोजगार व गरिबी मुक्त करण्याचे काम मोदी सरकारने केलेला आहे. म्हणून आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपाला साथ देण्याचे सांगून गेल्या 40 वर्षापासून किणी वाडीच्या ग्रामस्थांनी समाजकारण व राजकारण करत असताना कल्याणशेट्टी परिवाराला आपल्या परिवारातला व्यक्ती समजून पाठिंबा देत आलात, आगामी काळात ही असेच आशीर्वाद देण्याचे भावनिक आव्हान करून किणीवाडीच्या विकास करण्यास कटिबद्ध असून, मूलभूत सोयी सुविधेचे आणखीन काही कामे राहिल्यास ते सुचवा तत्परतेने सोडवणार असल्याचे आमदार कल्याणशेट्टी प्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी पालापूरचे सरपंच शेकपा कलकटगे, शिवानंद वाले, वैभव पाटील, सिद्धाराम व्हनशेट्टी, भीमाशंकर तुळजापुरे, राजकुमार खवळे, सिद्धाराम धर्मसाले, राजकुमार कवडे, सुरेश कलशेट्टी, अशोक मजगे, नारायण बंदीछोडे, गोवर्धन जाधव, शिवपुत्र कोरे, रवी राठोड, बादोलाचे सरपंच माणिक धायगोडे, आप्पासाहेब किवडे, सुरेश त्रिगुळे, धनराज बिराजदार, बसवराज मनगुळी, शिवानंद धर्मसाले, रवी राठोड, धनराज पाटील, सिद्धाराम पाटील, चन्मलप्पा बिराजदार, राहुल काळे, गजानन निंबाळ, शिवानंद निंबाळ , आप्पासाहेब बिराजदार, वैजनाथ वर्दे, सुधाकर वाकडे आधीसह केणेवाडीच्या पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक महिला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन बिराजदार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button