छत्रपती चौक मध्यवर्ती शिवजयंती मंडळातर्फे हजारोंच्या उपस्थित वाद्यवृंदाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे शुभारंभ आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
अक्कलकोट येथील बसस्थानका समोरील छत्रपती चौक मध्यवर्ती शिवजयंती मिरवणुकीत आ. सचिन कल्याणशेट्टी, महेश इंगळे, महेश हिंडोळे, तम्मा शेळके,बसलिंगप्पा खेडगी आदीजण दिसत आहेत

*🔶अक्कलकोट* दि.24: (प्रतिनिधी)
छत्रपती चौक मध्यवर्ती शिवजयंती मंडळातर्फे हजारोंच्या उपस्थित वाद्यवृंदाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे शुभारंभ आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.*

गुरुवारी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन श्री स्वामी समर्थ देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आले. याप्रसंगीआ.सचिन कल्याणशेट्टी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तम्मा शेळके, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण जाधव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप सिद्धे, माजी पक्षनेते महेश हिंडोळे, अमोलराजे भोसले, इंजि. वरुण शेळके, बाबासाहेब निंबाळकर, अतुल जाधव, राम जाधव, रवीना राठोड, बाळासाहेब मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मिरवणूकीत कराड येथील मल्लखांब, टिपरी संघ यांनी आपले प्रेक्षणीय खेळ सादर केले. मुलींच्या मल्लखांब संघाने अत्यंत प्रेक्षणीय कसरती सादर केले.

यामुळे प्रेक्षकांची दूतर्फी गर्दी झाली होती. सदर मिरवणूक कारंजा चौक, मेन रोड, फत्तेसिंह चौक आदी प्रमुख मार्गाने काढण्यात आले. मिरवणुकीच्या अग्रभागी अध्यक्ष झाकीर तांबोळी, उपाध्यक्ष ओंकार कांबळे, प्रकाश गायकवाड, सचिव वैजनाथ मुकडे, सुहास सुरवसे, अनिल मोरे, सुहास मोरे, स्वामीनाथ लोणारी, भीमा कोळी, राहुल शेळके, दादा शिंदे, अप्पू किणगी, स्वामींनाथ पवार, इरणा गवंडी, प्रशांत विटकर, प्रज्वल पाटोळे, प्रशांत टोकोळे, दर्शन चव्हाण, दत्ता पतंगे, समीर एरंडे, बाळू शिंदे, ऋषी लोणारी, अविराज सिद्धे, आदीजण उपस्थित होते.

चौटक :- सदर मंडळाचे सन १९९० पासून मागील ३४ वर्षा पासून परंपरा कायम ठेवली. देखावा केरळ राज्यातून आलेले पारंपरिक वाद्य, दांडपट्टा, महिलांचे खेळ मलखांब, मैदानी खेळ सदर शिवजयंती सातत्याने सुरू ठेवण्यास संस्थापक अध्यक्ष तम्मा शेळके यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ:- अक्कलकोट येथील बसस्थानका समोरील छत्रपती चौक मध्यवर्ती शिवजयंती मिरवणुकीत आ. सचिन कल्याणशेट्टी, महेश इंगळे, महेश हिंडोळे, तम्मा शेळके,बसलिंगप्पा खेडगी आदीजण दिसत आहेत